सहर शेखच्या वक्तव्याविरोधात निरंजन डावखरे अन् किरीट सोमय्या आक्रमक, मुंब्रा पोलीस ठाण्यात पोहोचले अन्..

Niranjan Davkhare and Kirit Somaiya became aggressive against Sahar Sheikh statement : दरम्यान, ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. या प्रभागातून AIMIMच्या सहर शेख यांनी दणदणीत विजय मिळवत राजकारणात लक्षवेधी एन्ट्री केली. विजयानंतर त्यांनी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केल्याने वादाला तोंड फुटलं.

Niranjan Davkhare and Kirit Somaiya became aggressive against Sahar Sheikh statement :

Niranjan Davkhare and Kirit Somaiya became aggressive against Sahar Sheikh statement :

मुंबई तक

22 Jan 2026 (अपडेटेड: 22 Jan 2026, 03:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सहर शेखच्या वक्तव्याविरोधात निरंजन डावखरे अन् किरीट सोमय्या आक्रमक,

point

मुंब्रा पोलीस ठाण्यात पोहोचले अन्..

Niranjan Davkhare and Kirit Somaiya became aggressive against Sahar Sheikh statement : मुंब्रा येथील AIMIM नेत्या आणि नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी दोघांनी आज मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. यावेळी किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोलिसांना दाखवत तातडीची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

हे वाचलं का?

दरम्यान, पोलीस प्रशासनाने यापूर्वीच सहर शेख यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही कारवाई अपुरी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये सहर शेख यांच्या म्हणण्यानुसार “येणाऱ्या काळात वृक्षारोपण करून संपूर्ण मुंब्रा हिरवागार करू” अशा स्वरूपाची नोंद असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. मात्र त्यांच्या मूळ भाषणात अशा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसल्याचा दावा करत, हे वक्तव्य गंभीर स्वरूपाचं असून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंब्रा परिसरातील हिंदू समाजाला धमकावण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगत सहर शेख यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्या केली.

दरम्यान, ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. या प्रभागातून AIMIMच्या सहर शेख यांनी दणदणीत विजय मिळवत राजकारणात लक्षवेधी एन्ट्री केली. विजयानंतर त्यांनी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केल्याने वादाला तोंड फुटलं.

हेही वाचा : मुंबईचं महापौर पद कोणासाठी राखीव? राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

सहर शेखने कोणतं वक्तव्य केलं होतं?? 

विजयानंतरच्या सभेत सहर शेख यांनी, “काहींना वाटत होतं आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे,” असं वक्तव्य केलं होतं. पुढे बोलताना त्यांनी, “पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठं उत्तर द्यायचं आहे. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे,” असं विधान केलं होतं. याच वक्तव्यावरून भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सहर शेखने वादग्रस्त वक्तव्यावर कोणतं स्पष्टीकरण दिलं? 

वाद वाढल्यानंतर सहर शेख यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. “हिरवा हा आमच्या पक्षाचा रंग आहे. रंग कोणत्याही धर्माशी जोडलेले नसतात. संविधानात कुठेही हिरवा मुस्लिमांचा आणि भगवा हिंदूंचा रंग आहे असं नमूद नाही. माझं वक्तव्य धर्माच्या आधारावर नव्हतं, तर राजकीय आशयाचं होतं,” असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे मुंब्रा परिसरातील राजकीय वातावरण तापलं असून, पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, भाजपच्या गोटातून 'या' नगरसेविकेचं नाव सर्वात आघाडीवर

    follow whatsapp