पिंपरी-चिंचवडचा महापौर खुल्या प्रवर्गातून निवडला जाणार, भाजपमधून 5 तगडी नावं चर्चेत

Pimpari Chinchwad Municipal Corporation PCMC : पिंपरी-चिंचवडमध्ये कोणती नावं चर्चेत आहेत? याबद्दल आपण बोलूच, पण पहिला नंबर पुण्याचा. पुण्याचं महापौरपद ओपन महिलेला राखीव झाल्यानंतर सात ते आठ नावं समोर आलीत, जे महापौर होण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामध्ये मानसी देशपांडे, मंजुषा नागपूरे, निवेदिता एकबोटे, स्वरदा बापट, रंजना टिळेकर, वर्षा तापकिर आणि मानसी देशपांडे या नावांची चर्चा आहे.

Pimpari Chinchwad Municipal Corporation PCMC

Pimpari Chinchwad Municipal Corporation PCMC

अतिक शेख

22 Jan 2026 (अपडेटेड: 22 Jan 2026, 04:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पिंपरी-चिंचवडचा महापौर खुल्या प्रवर्गातून निवडला जाणार

point

भाजपमधून 5 तगडी नावं चर्चेत

Pimpari Chinchwad Municipal Corporation PCMC : पुणे महानगरपालिकेचं महापौरपद ओपन महिलेसाठी राखीव झालं आहे. तर पिंपरी-चिंचवडचा कारभारी खुल्या प्रवर्गातून निवडला जाणारय. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीनंतर आज दुपारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कुठल्या प्रवर्गातून महापौर निवडले जातील? हे जवळपास स्पष्ट झालंय. त्यानंतर आता पुण्यातून ओपन महिला आणि पिंपरी-चिंचवडमधून खुल्या प्रवर्गातील इच्छूकांनी महापौरपदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. पुण्यात महापौरपदासाठी तब्बल सात ते आठ नावांची चर्चा असून पिंपरी चिंचवडमध्येही पाच नावांवर भाजपकडून विचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या दोन्ही महापालिकांमध्ये महापौरपदासाठी कोणती नावं चर्चेत आहे? हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचंय.

हे वाचलं का?

पिंपरी-चिंचवडमध्ये कोणती नावं चर्चेत आहेत? याबद्दल आपण बोलूच, पण पहिला नंबर पुण्याचा. महापौरपद ओपन महिलेला राखीव झाल्यानंतर सात ते आठ नावं समोर आलीत, जे महापौर होण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामध्ये मानसी देशपांडे, मंजुषा नागपूरे, निवेदिता एकबोटे, स्वरदा बापट, रंजना टिळेकर, वर्षा तापकिर आणि मानसी देशपांडे या नावांची चर्चा आहे. भाजपने पुणे शहरात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या नेतृत्वात विजय मिळवला होता. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बीडकर या नेत्यांची भूमिका महापौर निवडताना अत्यंत महत्त्वाची ठरणारय. भाजपकडून जी नावं पाठवली जाईल, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जातंय.

पुणे शहरानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये कुणाचा महापौर होणार? याबद्दलही चर्चा सुरू झाल्यात. कारण पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाची जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटली आहे. त्यामुळे भाजपकडून पाच नावांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शत्रुघ्न बापू काटे, रवी लांडगे, माऊली जगताप, जालींदर शिंदे आणि शीतल उर्फ विजय शिंदे या नेत्यांनी महापौरपदासाठी जोरदार फिल्डिंग लावलीय. राष्ट्रवादीला हरवण्यात भाजप आमदार महेश लांडगेंनी मोठी भूमिका पार पाडली होती. त्यामुळे आमदार शंकर जगताप आणि अमित गोरखे यांची महापौर निवडण्यात भूमिका असणार की लांडगेंच्या मर्जीतला नगरसेवक महापौरपदी बसेल? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, भाजपच्या गोटातून 'या' नगरसेविकेचं नाव सर्वात आघाडीवर
 

    follow whatsapp