नवी दिल्ली: देश आज 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहे. राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाकडे देशभरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सोहळ्याला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर आगमन झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विविध मान्यवरांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.
यानंतर पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रीय ध्वज फडकावला. ध्वजारोहणानंतर सुरक्षा दलांकडून पंतप्रधानांना राष्ट्रीय सलामी देण्यात आली. बँडने राष्ट्रगीताची धून वाजवली आणि यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली.
PM मोदींचं देशाला संबोधन
ध्वजारोहण आणि राष्ट्रगीतानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. आपल्या भाषणातून ते देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत.
पंतप्रधानांच्या भाषणात देशाची सुरक्षा, अर्थव्यवस्था, विकास, रोजगार, तरुणांसाठीच्या संधी, आत्मनिर्भर भारत आणि भारताच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप यासह विविध मुद्द्यांवर भर राहण्याची शक्यता आहे.
सोहळ्यापूर्वी मान्यवरांचं आगमन
- स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी लाल किल्ल्यावर विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आणि केंद्रीय मंत्र्यांचं आगमन झालं.
- 6:55 वाजता संरक्षण सचिवांचं आगमन
- 6:56 ते 7:00 या वेळेत तिन्ही सेनादलांचे प्रमुख, CDS आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आगमन
- 7:05 वाजता संरक्षण राज्यमंत्र्यांचं आगमन
- 7:11 वाजता संरक्षण मंत्र्यांचं आगमन
- 7:18 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर दाखल
- 7:30 वाजता राष्ट्रगीताची धून, ध्वजारोहण, राष्ट्रीय सलामी आणि 21 तोफांची सलामी
- 7:36 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला संबोधनाला सुरुवात
मोदींच्या भाषणाकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यातून देशाला संबोधित करत आहेत. त्यामुळे यंदाच्या भाषणात ते कोणते मुद्दे मांडतात आणि कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करतात, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचंही लक्ष आहे.
देशाच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी सरकारची पुढील दिशा काय असेल? तरुण, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्गासाठी कोणत्या घोषणा होणार? अर्थव्यवस्था आणि रोजगाराबाबत मोदी काय बोलणार? याबाबत उत्सुकता आहे.
तसंच देशाची सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्र, तंत्रज्ञान, आत्मनिर्भरता आणि भारताला जागतिक पातळीवर अधिक मजबूत करण्यासाठी सरकारची भूमिका याबाबतही पंतप्रधान आपल्या भाषणातून महत्त्वाचे मुद्दे मांडू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, घोषणा आणि स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील प्रत्येक अपडेट जाणून घ्या.
ADVERTISEMENT












