Rajya Sabha 2024 : अजित पवारांचा चक्रावून टाकणारा निर्णय! खासदारालाच दिली उमेदवारी

भाजप, शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

Ajit pawar

Ajit pawar

मुंबई तक

14 Feb 2024 (अपडेटेड: 14 Feb 2024, 07:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांचा चक्रावून टाकणारा निर्णय!

point

राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार ठरला

point

राज्यसभेच्या उमेदवारीतून राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पत्ता कट

Rajya Sabha Election 2024: भाजप, शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आता खासदारकीचा राजीनामा देऊन ते पुन्हा उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. 

हे वाचलं का?

तटकरेंची घोषणा

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवारी म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पटेल आता खासदारकीचा राजीनामा देऊन उद्या ते अर्ज भरणार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा ही सुनील तटकरेंकडून करण्यात आली आहे. 

निवडणुकीचं गणित

महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत  आहे. त्या जागांवरील निवडणूक आता जाहीर झाली आहे. तर यानिवडणुकीसाठी 31 मे पर्यंतही अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर 10 जून रोजी मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या 6 जागांपैकी 5 जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा>> पार्थ पवारांसाठी अजित पवारांची काय असणार रणनीति

खासदार असलेले प्रफुल पटेल का लढवताहेत निवडणूक?

प्रफुल पटेल हे २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचा कार्यकाळ अजून बाकी आहे. राज्यसभा खासदाराचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो. पण कालावधी संपवण्यापूर्वीच पटेल का निवडणूक लढवत आहे, असा प्रश्न उपस्तित होत आहे. 

अपात्रतेसाठी याचिका 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितलं की, प्रफुल पटेल हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांना खासदारकी पुढील सहा वर्षांसाठी निश्चित करायची आहे. त्यामुळेच ते नव्याने निवडणूक लढवत आहे. दुसरी बाब म्हणजे शरद पवार गटाने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात याचिका दाखल केलेली आहे. त्या कारवाईतून वाचण्यासाठीही हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

पार्थ पवारांचा पत्ता कट

राज्यसभेच्या उमेदवारीची चर्चा चालू झाल्यानंतर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याही नावाची जोरदार चर्चा होती. मात्र आता प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने पार्थ पवारांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

    follow whatsapp