Prateek Yadav postmortem Report : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र प्रतीक यादव यांचे बुधवारी वयाच्या 38 व्या वर्षी अचानक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता पोस्टमार्टमचा प्राथमिक अहवाल समोर आला असून, मृत्यूचे कारण अत्यंत धक्कादायक आहे. अहवालानुसार, मृत्यूचे मुख्य कारण 'पल्मोनरी थ्रोम्बोम्बोलिज्म' असल्याचे सांगण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, त्यांच्या फुफ्फुसाच्या नसांमध्ये रक्ताची एक मोठी गुठळी जमली होती, ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुसाने अचानक काम करणे बंद केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांच्या शरीरावर काही जखमांच्या खुणाही आढळल्या आहेत, परंतु त्या जुन्या असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, आजारपणामुळे त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याचे नख निळे पडले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सूनेला तोकड्या कपड्यात रील बनवण्याचं वेड, सासू-सासऱ्यांचं भयंकर पाऊल
वैद्यकीय तपासणी आणि Viscera रिपोर्टची प्रतीक्षा
मृत्यूचे नेमके आणि अंतिम कारण स्पष्ट करण्यासाठी डॉक्टरांनी अत्यंत सावधगिरी बाळगली आहे. तपासणी अधिक अचूक व्हावी यासाठी Viscera आणि हृदयाचे काही भाग रासायनिक तसेच हिस्टोपॅथोलॉजिकल चाचणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. Viscera रासायनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे, जेणेकरून शरीरात कोणतेही विष किंवा इतर रसायने होती का, याची पुष्टी होऊ शकेल. आता सर्वांचे लक्ष Viscera अहवालाकडे लागले आहे, ज्यानंतरच मृत्यूच्या कारणावरील शिक्कामोर्तब होईल. सिव्हिल हॉस्पिटलचे संचालक डॉ. जी.सी. गुप्ता यांनी सांगितले की, सकाळी 5:30 च्या सुमारास ड्रायव्हरने रुग्णालयात येऊन मदतीची मागणी केली होती, मात्र वैद्यकीय पथक घरी पोहोचले तेव्हा प्रतीक यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला कुटुंबीय मृतदेह घरी नेऊ इच्छित होते, परंतु नंतर पोस्टमार्टेमसाठी सहमती दर्शवण्यात आली.
हेही वाचा : पुणे : ब्युटीशियनला प्रियकराने गाडीतच संपवलं, गोरखनाथने आफरीनचा काटा काढला
प्रदीर्घ आजारपण आणि अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया
प्रतीक यादव हे गेल्या काही वर्षांपासून गंभीर आरोग्य समस्यांनी त्रस्त होते. डॉक्टरांच्या मते, ते 'डीप वेन थ्रोम्बोसिस' (DVT), पल्मोनरी एम्बोलिज्म आणि हृदयाशी संबंधित आजारांशी झुंजत होते. या दुर्दैवी घटनेवर त्यांचे सावत्र भाऊ आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अखिलेश यादव म्हणाले की, प्रतीक अत्यंत कष्टाळू आणि साध्या स्वभावाचे व्यक्ती होते, ज्यांना स्वतःच्या कष्टावर ओळख निर्माण करायची होती. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भेटीत त्यांनी प्रतीकला प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्लाही दिला होता.
प्रतीक यादव यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून समाजवादी पार्टी आणि भाजपाने आपले सर्व नियोजित राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शिवपाल यादव आणि काँग्रेस नेत्यांसह अनेक दिग्गजांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. प्रतीक यांचे पार्थिव गुरुवारी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येईल. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही जुन्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पुणे : ब्युटीशियनला प्रियकराने गाडीतच संपवलं, गोरखनाथने आफरीनचा काटा काढला
ADVERTISEMENT











