विद्यार्थ्यांसाठी उपोषण करणाऱ्या नितीन गितेचं जोरदार भाषण, रोहित पवार पण हसले

मुंबई तक

• 08:25 AM • 11 Oct 2026

पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थी आंदोलनाला आंदोलनस्थळी पोहोचून अनेक नेते विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत आपली भूमिका मांडत आहेत. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी उपोषण करणाऱ्या नितीन गिते या तरुणाने जोरदार भाषण केलं.

MPSC Student Protest Pune

MPSC Student Protest Pune

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थ्यांसाठी उपोषण करणाऱ्या नितीन गितेचं जोरदार भाषण

point

रोहित पवार पण हसले

MPSC Student Protest Pune : पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून, आंदोलनादरम्यान उपोषण करणारे तरुण नेते नितीन गिते यांनी आपल्या भाषणात प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तब्येत खालावलेली असतानाही त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसमोर जोरदार भाषण करत प्रशासनाला थेट इशारा दिला. या आंदोलनात राजकीय नेते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे वाचलं का?

राज्याला अधिकारी देणारी पवित्र जागा

भाषणादरम्यान नितीन गिते यांनी MPSC आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यावर जोरदार निशाणा साधला. आयोगाची खुर्ची ही राज्याला प्रशासकीय अधिकारी देणारी पवित्र जागा आहे, मात्र या पदावर भ्रष्ट व्यक्तीला बसवण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. भीमनवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात कोरडं हवामान, काही भागांत अंगाची होणार लाही लाही

मागे हटणार नाही

आक्रमक भूमिका मांडताना गिते यांनी आयोगाच्या कारभारावर कडाडून टीका केली. हे आंदोलक शेतकरी आणि कास्तकारांची मुले असून, हक्काच्या मागणीसाठी ते मागे हटणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, गट 'ब' चा पेपर फुटल्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला असून, शासनाने यावर तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा : ‘24 तासांत आंदोलकांची सुटका करा, अन्यथा उपोषणाला बसेन!’ अभिजीत दिपकेंसाठी मोठा नेता उतरणार मैदानात

लढा थांबणार नाही

उपोषण सोडले असले तरी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ही लढाई अशीच लढावी लागेल, असे आवाहन गिते यांनी केले. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि संशयित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, आगामी काळात आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.