Maharashtra Weather : राज्यात कोरडं हवामान, काही भागांत अंगाची होणार लाही लाही

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी कोरडं हवामान राहणार असल्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 11 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

ADVERTISEMENT

Maharashtra Weather (AI Photo)
Maharashtra Weather (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यात काही ठिकाणी कोरडं हवामान

point

जाणून घेऊयात 11 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात सध्या काही ठिकाणी कोरडं हवामान आहे, तर काही भागांत उष्ण आणि दमट हवामानाची अधिकची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्ण आणि दमट हवानामाचा यलो अलर्ट वर्तविलेला आहे, अशातच जाणून घेऊयात 11 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : 'जे करायचे आहे ते करा, 10 हजार, 20 हजार, 50 हजार पोलीस..', राहुल गांधीचा CJP च्या आंदोलनावरील Video

कोकण 

कोकण विभागात पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड आणि ठाणे येथे उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तविलेला आहे. या सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

या विभागात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नाशिक घाटमाथा येथे कोरड्या हवामानाची स्थिती रहील असा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे कोरड्या हवानामाची स्थिती असणार आहे.