उपचारांचा खर्च परवडत नव्हता, आईने सहा वर्षांच्या लेकीला तलावात फेकलं
Crime News : महिलेनं कथितरित्या आपल्या सहा वर्षांच्या मुलीला हुसेनसागर तलावात फेकून दिले होते. घडलेल्या घटनेनुसार, महिली ही आजारामुळे आणि उपचाराचा खर्च परवडत नसल्याने त्रस्त झाली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेनं कथितरित्या आपल्या सहा वर्षांच्या मुलीला तलावात फेकलं
लेकीच्या आतड्यांना संसर्ग
Crime News : एका महिलेनं कथितरित्या आपल्या सहा वर्षांच्या मुलीला हुसेनसागर तलावात फेकून दिले होते. घडलेल्या घटनेनुसार, महिली ही आजारामुळे आणि उपचाराचा खर्च परवडत नसल्याने त्रस्त झाली होती. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या एका ऑटो चालकाने मुलीला तलावात पडताना पाहून तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. चालकाने आपली तत्परता दाखवून मुलीचे प्राण वाचण्यास मदत झाली. ही दुर्दैवी घटना हैदराबाद येथून उघडकीस आली आहे.
हे ही वाचा : CJP Protest Delhi : आंदोलनादरम्यान दगडफेक, दोन पोलीस गंभीर जखमी; Video व्हायरल
आईने तलावात फेकलेल्या मुलीला ऑटो चालकाने काढलं बाहेर
मुलीची ओळख रुक्सना अशी ओळख पटली आहे. दरम्यान ही ही घटना गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. तलावातून मुलीला बाहेर काढल्यानंतर तिला उपचारासाठी गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, मुलीची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली. या घटनेनं पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीची आई शबाना ही हैदराबाद येथील ओल्ड बोवेनपल्ली भागातील हसमतपेट येथील रहिवासी आहे. संबंधित प्रकरणात सांगण्यात येतेय की, शबानाच्या पतीने तिला सोडून दिले होते. त्यानंतर दोन मुलींना वाढवण्यासाठी तिने घरकाम केले होते. कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला मुलांच्या संगोपनासाठी आणि वैद्यकीय खर्च भागण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते.
लेकीच्या आतड्यांना संसर्ग
पोलिसांच्या माहितीनुसार, रुक्सानाला काही दिवसांपासून मोठ्या आतड्याचा संसर्ग झाला होता. सध्या तिची प्रकृती ही सुधारण्याच्या प्रयत्नात कुटुंबीयांनी तिला अनेकदा रुग्णालयात उपचारासाठी नेले होते, मात्र म्हणावी अशी प्रकृती सुधारत नव्हती. आई मुलांत तिच्या सुरू असलेल्या उपचाराच्या खर्चाबाबत ती खूपच चिंतेत होती.
