'जे करायचे आहे ते करा, 10 हजार, 20 हजार, 50 हजार पोलीस..', राहुल गांधीचा CJP च्या आंदोलनावरील Video

मुंबई तक

Rahul Gandhi : दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या मुद्द्यांवरून देशात आता रान पेटलं आहे. परिस्थिती पाहता दिल्लीत तब्बल 25 हजार पोलीस घटनास्थळी सुरक्षिततेसाठी दाखल करण्यात आलेत. याच पार्श्वभूमीवर आता खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी x ट्विट करत व्हिडिओ शेअर केला आहे.

ADVERTISEMENT

Rahul gandhi
Rahul gandhi
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

point

आंदोलनाबाबत राहुल गांधी यांचे x ट्विट

Rahul Gandhi :दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या मुद्द्यांवरून देशात आता रान पेटलं आहे. परिस्थिती पाहता दिल्लीत तब्बल 25 हजार पोलीस घटनास्थळी सुरक्षिततेसाठी दाखल करण्यात आलेत. याच पार्श्वभूमीवर आता खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, 'जे करायचे आहे ते करा, 10 हजार, 20 हजार, 50 हजार जेवढा पोलिसांचा फौजफाटा तैनात करायचाय तो करा. आम्ही बिलकुल मागे हटणार नाहीत... असे विस्तृत x ट्विट करत व्हिडिओ शेअर केला. सध्या त्यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा : CJP Protest Delhi : आंदोलनादरम्यान दगडफेक, दोन पोलीस गंभीर जखमी; Video व्हायरल

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी 

मी एक दशकाहून अधिक काळ नरेंद्र मोदी, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांविरुद्ध लढत आहे. इतर कोणालाही जसा आपला विरोधक ओळखता येतो, तसाच मी माझ्या विरोधकांना ओळखतो. मी त्यांना आतून-बाहेरून ओळखतो, त्यांच्या प्रत्येक हालचालीची मला जाणीव आहे.या लोकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भित्रेपणा. 

नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोवाल—या कथेतील खलनायक—आता हळूहळू कोंडीत सापडत आहेत. त्यांच्याभोवतीचा वेढा आक्रसत चालला आहे.तुम्हाला जे करायचे आहे ते करा. तुम्हाला हवे तितके पोलीस बोलवा 10 हज़ार, 20 हज़ार, 50 हज़ार  तितके. सर्व नेत्यांना अटक करा. सर्व तरुणांना अटक करा. आम्हा सर्वांना अटक करा.

हे ही वाचा : 'मोदी-शाहांच्या मनात अत्यंत पराकोटीची...', राज ठाकरेंचा प्रचंड संताप अन् जोरदार हल्लाबोल!

घाबरू नका आम्ही तुम्हाला सर्व बाजूंनी घेरले आहे, आणि आम्ही मागे हटणार नाही. माझे शब्द लक्षात ठेवा आम्हाला हवी असलेली माहिती आमच्याकडे आधीच आहे. आम्ही आमच्या संविधानाचे रक्षण करू. आम्ही भारताच्या जनतेच्या आवाजाचे रक्षण करू. आणि आम्ही हे सुनिश्चित करू की, गेल्या 10-15 वर्षांत भारतासोबत जे घडले आहे, ते कोणत्याही परिस्थितीत पुन्हा कधीही घडणार नाही. भारताच्या तरुण पिढी, मला तुमचा अभिमान आहे. तुमचे आंदोलन चालू ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही हे सुनिश्चित करू की, हे सरकार आणि जे आपल्या संविधानावर हल्ला करतात, त्यांचा पराभव होईल, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी त्यांच्या X ट्विटरवर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलीय.