जळगाव : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रविवारी (23 एप्रिल) जळगावमधील पाचोऱ्यामध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेपूर्वी ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत आर. ओ. पाटील (R. O. Patil) यांच्या 11 फुटी भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसंच जैवी प्रयोगशाळेचेही उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, या अनावरणाला आता 24 तास होण्यापूर्वीच आर. ओ. पाटील यांचे पुतणे आणि शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पुतळ्याला दुग्धाभिषेक करत पूजन करण्यात आले. (R. O. Patil’s nephew and Shiv Sena MLA Kishore Patil worshiped the statue)
ADVERTISEMENT
कालच्या सभेत ठाकरे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर ठाकरेंच्या या सभेला प्रत्युत्तर म्हणून किशोर पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत पुतळ्यापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रोपचारात करत आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि पूजन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर पाटील यांच्या आई, पत्नी, मुलगी, मुलगा या परिवाराची तसेच शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
ठाकरेंच्या हस्ते पुतळ्याच अनावरण, सभेतही आठवणीने भावूक… कोण होते आर. ओ. पाटील?
यानंतर बोलताना किशोर पाटील म्हणाले, कुटुंबातील वाद आणि वादाला सुरुवात जर कोणी केली असेल तर मला वाटत ती उद्धव ठाकरे आणि ‘मातोश्री’वरून झाली आहे. त्यांना जर आमच्या कुटुंबाबद्दल कळवळा असता तर त्यांनी वैशुताईं (आर. ओ. पाटील यांची मुलगी) सांगितलं असतं तू दिल्या घरी सुखी रहा. ज्या वैशु ताईचा 25 वर्ष राजकारणाशी संबंध नव्हता त्या वैशु ताईमध्ये अचानक कसा शिवसैनिक जागृत झाला हा सांशोधनाचा विषय आहे. तिकडे दिघे साहेबांच्या पुतण्याला हाताशी घेऊन शिंदे साहेबांच्या कुटुंबात वाद निर्माण केला जात आहे. आता इथे मला आर.ओ. पाटील तात्यांचा राजकीय वारदार घोषित केल्यानंतर वैशुताईंला पक्षात घेतलं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने कुटुंबामध्ये फोड करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत, हे पाप कुठं भरतील असा माझा प्रश्न आहे.
आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण :
दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसंच जैवी प्रयोगशाळेचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना वैशाली पाटील म्हणाल्या, तात्यांनी भव्य प्रयोगशाळा उभी केली. या प्रयोगशाळेचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते व्हावं, अशी त्यांची मनस्वी इच्छा होती. पण त्यांच्या निधनानंतर स्वप्न अधुरं राहीलं होतं. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं. त्यांची इच्छा पूर्ण झाली. तसंच आज उद्धव ठाकरे यांनी तात्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारे तात्या आज प्रत्यक्ष बोलत होते असं वाटत होतं. जशी दोघांची भेट व्हायची तशी उद्धव साहेब आणि त्यांची भेट झाली, असे भावनिक मतही त्यांनी व्यक्त केलं.
“अशा घुशी खूप पाहिल्या, आता शेपटीला धरायचं अन्…” : गुलाबरावांच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर
आर. ओ. पाटील यांच्या आठणवीत भावूक :
त्यानंतर सभेत बोलताना उद्धव ठाकरे सुरुवातीलाच आर. ओ. पाटील यांच्या आठवणीत भावूक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, आज खरच तात्यांची उणीव भासते. एक कणखर खंदा, जिद्दी, मेहनती आणि अत्यंत विश्वासू सहकारी जाणे हे फार मोठं नुकसान असतं. 40 गद्दार, हरामखोर गेले तरी फरक पडत नाही परंतु एक विश्वासू माणूस जातो तेव्हा फार मोठा खड्डा पडतो.
ADVERTISEMENT
