Rahul Gandhi on girlfriend : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील एका आठवणीचा उल्लेख केला आहे. सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला. आई सोनिया गांधी आणि वडील राजीव गांधी यांची प्रेमकहाणी ज्या रेस्टॉरंटमध्ये सुरू झाली, त्या ठिकाणी आपण आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन गेल्याची आठवण त्यांनी सांगितली. नवी दिल्लीत पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी यांनी आपल्या आई-वडिलांच्या नात्याशी संबंधित काही आठवणी सांगितल्या. त्यांच्या या भाषणातील गर्लफ्रेंडच्या उल्लेखाची चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: सरकारी कंत्राटदारांना निधी देऊन कमाई करता येते? पण 'हे' गणित समजून घ्या!
राहुल गांधी यांनी सांगितलं की, त्यांच्या आई-वडिलांची भेट केंब्रिजमधील एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. त्यांच्या कुटुंबात आई-वडिलांच्या पहिल्या भेटीबाबत अनेक आठवणी सांगितल्या जातात. याच आठवणीमुळे अनेक वर्षांनंतर आपण केंब्रिजला गेलो असताना आपल्या गर्लफ्रेंडला त्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या मैत्रिणीला या रेस्टॉरंटचं महत्त्व माहित नव्हतं. आपण तिला आई-वडिलांची भेट ज्या ठिकाणी झाली होती, ते रेस्टॉरंट दाखवण्यासाठी घेऊन जात असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. त्यानंतर दोघेही त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. तिथे प्रवेश करताच त्यांना पिवळ्या रंगाचा दरवाजा दिसला. दरवाजाजवळ एक व्यक्ती उभी होती. किती जण आहात, अशी विचारणा केल्यानंतर राहुल गांधी यांनी दोन जण असल्याचं सांगितलं आणि दोघेही आत जाऊन बसले.
रेस्टॉरंटमध्ये बसल्यानंतर राहुल गांधी यांनी तिथल्या कर्मचाऱ्याला आपल्या आई-वडिलांची भेट याच ठिकाणी झाली होती, असं सांगितलं. त्यावर त्या कर्मचाऱ्याने लगेचच त्यांना ओळखलं. 'अरे, ते दोघे! मला ते माहीत आहेत. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात, हे मला अगदी बरोबर समजलं,' असं त्या कर्मचाऱ्याने सांगितल्याची आठवण राहुल गांधी यांनी सांगितली. त्यानंतर राहुल गांधी यांनी जेवणाच्या मेन्यूमधील चांगला पदार्थ कोणता, अशी विचारणा केली. कर्मचाऱ्याने चिकन चॉप्स चांगले असल्याचं सांगितलं. त्यानुसार दोघांनीही चिकन चॉप्स मागवले. मात्र, जेवणाचा अनुभव चांगला नव्हता, असं राहुल गांधी यांनी मिश्किलपणे सांगितलं. या रेस्टॉरंटमध्ये प्रेमात पडायचं असेल तर नक्की जा, पण तिथले चिकन चॉप्स कधीही खाऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
'तुमची गर्लफ्रेंड आता कुठे असते?', राहुल गांधींचं उत्तर
दरम्यान, प्रस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर जात असताना राहुल गांधी यांना एका व्यक्तीने 'तुमची गर्लफ्रेंड आता कुठे असते?' असा प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी यांनी ती आपली मैत्रीण असल्याचं उत्तर दिलं.
ADVERTISEMENT












