'अमेरिका से भारत आया था चुपके-चुपके, उनका नाम है अभिजीत दिपके'; रामदास आठवलेंची भन्नाट कविता ऐकाच

मुंबई तक

01 Aug 2026 (अपडेटेड: 01 Aug 2026, 09:43 AM)

ramdas athawale poem on abhijeet dipke rajya sabha speech : राज्यसभेत Anti-Paper Leak Bill वरील चर्चेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास काव्यशैलीत अभिजीत दिपके यांचा उल्लेख करत कविता सादर केली. त्यानंतर त्यांनी आंदोलन, लाठीचार्ज आणि सरकारच्या भूमिकेवरही आपले मत व्यक्त केले.

ramdas athawale poem on abhijeet dipke rajya sabha speech

ramdas athawale poem on abhijeet dipke rajya sabha speech

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'अमेरिका से भारत आया था चुपके-चुपके, उनका नाम है अभिजीत दिपके'

point

रामदास आठवलेंची भन्नाट कविता ऐकाच

Ramdas Athawale poem on Abhijeet Dipke rajya sabha speech : राज्यसभेत Anti-Paper Leak Bill वरील चर्चेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत अभिजीत दिपके यांचा उल्लेख कवितेतून केला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी, "अमेरिका से भारत आया था चुपके-चुपके, अमेरिका से जो भारत आया था चुपके-चुपके, उनका नाम है अभिजीत दीपके, अभिजीत दीपके" या ओळी सादर केल्या. या कवितेनंतर सभागृहात वेगळेच वातावरण निर्माण झाले. त्यानंतर त्यांनी सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत सरकारची भूमिका मांडली.

हे वाचलं का?

हेही वाचा : ‘मला तर शिव्या दिल्या पण माझ्या स्वर्गीय आईला सुद्धा.., आपल्या मुली अशी भाषा कशी बोलू शकतात?’, PM मोदींचा नवा Insta Reel

लाठीचार्जचे समर्थन नाही, आठवलेंची चौकशीची मागणी 

रामदास आठवले यांनी सांगितले की, आंदोलन अनेक दिवस शांततेत सुरू होते आणि त्या काळात पोलिसांनी कोणतीही लाठीचार्जची कारवाई केली नव्हती. मात्र, संसदेकडे घुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, असे त्यांनी म्हटले. त्याचवेळी त्यांनी लाठीचार्जचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच पोलिसांकडून चूक झाली असेल तर संबंधितांवर कारवाई व्हावी, अशीही भूमिका त्यांनी मांडली. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करणारे सरकार असल्याचे सांगत त्यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असल्याचा दावा केला.

हेही वाचा : 'जेन झी'नं सनातन धर्म जगला, गीतांजली आंगमो यांचं वक्तव्य; आता अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

अभिजीत दीपके आंबेडकरवादी भी है - रामदास आठवले 

भाषणादरम्यान आठवले यांनी अभिजीत दिपके यांचा पुन्हा उल्लेख करत, "अमेरिका से भारत आया था चुपके-चुपके, अमेरिका से जो भारत आया था चुपके-चुपके, उनका नाम है अभिजीत दीपके, अभिजीत दीपके मेरे समाज का है, अभिजीत दीपके आंबेडकरवादी भी है." या ओळी पुन्हा सादर केल्या. त्यांनी आंदोलनाचा विषय महत्त्वाचा असल्याचे सांगत सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्याचा दावा केला. तसेच सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आल्याचेही त्यांनी भाषणात नमूद केले. आंदोलनादरम्यान सरकारकडून सातत्याने संवाद सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी रामदास आठवले यांनी विरोधकांवरही टीका केली. काहीजण विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष दिल्याचे सांगत त्यांनी Anti-Paper Leak Bill चे समर्थन केले. भविष्यात पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी विरोधकांनी सूचना द्याव्यात, सरकार त्या ऐकेल आणि आवश्यक ते बदल करेल, असेही त्यांनी म्हटले. भाषणाच्या शेवटी त्यांनी "जय भीम, जय भारत" अशा घोषणांसह आपले भाषण पूर्ण केले.