Anand Dighe: 'दिघेंनी हॉस्पिटमध्ये असताना मला सांगितलेली 'ती' गोष्ट', कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam Allgation Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना भिती असावी, माझ्यापेक्षा महाराष्ट्रात कोणी भविष्यात कोणी मोठा होता कामा नये. जसे माझ्यासकट अनेक नेत्यांचे त्यांनी पंख कापले. तसे त्यांचेही (आनंद दिघे) पंख कापण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले की काय? असा संशय माझ्या मनात आहे, असा देखील आरोप कदमांनी केला.

 उद्धव ठाकरे त्यावेळेला आनंद दिघेंचे खच्चीकरण करायचे

ramdas kadam big allegation on udhhav thackeray anand dighe death controversy dharmveer 2 shiv sena eknath shinde maharashtra politics

मुंबई तक

30 Sep 2024 (अपडेटेड: 30 Sep 2024, 07:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आनंद दिघे आणि मी जवळचे मित्र होतो

point

ठाण्याच्या विकास कामांची यादी ते माझ्याकडे द्यायचे

point

उद्धव ठाकरे आनंद दिघेंचे खच्चीकरण करायचे

Ramdas Kadam Allgation Uddhav Thackeray: मुंबई: दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत असलेला धर्मवीर 2 (Dharmveer 2) सिनेमा रीलीज झाला आहे. या सिनेमानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)  यांनी ''आनंद दिघे यांना मारलं गेलं, हे अख्खं ठाणे जिल्हा जाणतो'' असे मोठं विधान केले होतं. या विधानानंतर आनंद दिघेंच्या मृत्यूवरून वाद पेटला होता. असे असतानाच शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यावेळेला आनंद दिघेंचे खच्चीकरण करायचे असा गंभीर आरोप रामदास कदम (Ramdad Kadam) यांनी केला आहे. ( ramdas kadam big allegation on udhhav thackeray anand dighe death controversy dharmveer 2 shiv sena eknath shinde maharashtra politics) 

हे वाचलं का?

रामदास कदम यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत रामदास कदम यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून सूरू असलेल्या वादावर भाष्य केले आहे. ''आनंद दिघे आणि मी जवळचे मित्र होतो. ज्यावेळी 1995 मध्ये शिवेसेनेचे शासन आले तेव्हा आनंद दिघे ठाण्याच्या विकास कामांची यादी माझ्याकडे द्यायचे.मी ते मंजूर करून आणायचो आणि माझ्याहस्ते ते भूमिपूजन करून आणायचे'',असे रामदास कदम यांनी सांगितले. तसेच सध्या 'आनंद दिघेंचा खून कोणी केला?,कसा केला?, मृत्यू कसा झाला? यावर निवडणुकीच्या तोंडावर चर्चा करायची वेळ नाही', असे देखील कदमांनी सांगितले. 

हे ही वाचा : Cabinet Meeting: मोठी भरती, भत्त्यांमध्ये वाढ... शिंदे सरकारने Cabinet बैठकीत 'हे' मोठे निर्णय

रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर देखील गंभीर आरोप केला. ''आनंद दिघेंचा ठाणे जिल्हाप्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितला होता. ज्यावेळेस हा अपघात घडला आणि ते हॉस्पिटलला अॅडमीट होते. त्याच दरम्यान आनंद दिघे स्वत: मला बोलले होते. त्यामुळे आनंद दिघेंचे खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंकडून त्यावेळेला सूरू होतं, हे 100 टक्के सत्य आहे'',  असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. 

''आनंद दिघे हे बाळासाहेबांना देवासारखे मानायचे. पण काही लोक जे म्हणतायत बाळासाहेबांपेक्षा दिघेंना मोठं करण्याचं काम सूरू आहे. हे अत्यंत चूकीच आणि दिशाभूल करणारे वक्तव्य आहे. बाळासाहेब हे बाळासाहेबच आहेत. आणि धर्मवीर आनंद दिघेंचे काम हे बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच सूरू होते. पण उद्धव ठाकरे यांना भिती असावी, माझ्यापेक्षा महाराष्ट्रात कोणी भविष्यात कोणी मोठा होता कामा नये. जसे माझ्यासकट अनेक नेत्यांचे त्यांनी पंख कापले. तसे त्यांचेही (आनंद दिघे) पंख कापण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले की काय? असा संशय माझ्या मनात आहे, असा देखील आरोप कदमांनी केला. 

    follow whatsapp