'दोन नंबरला किंमत नसते.." रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने शिंदेसेना आणि भाजपमधील वाद शिगेला, डोंबिवलीत चव्हाणांसमोरच..

मुंबई तक

30 Nov 2025 (अपडेटेड: 30 Nov 2025, 02:56 PM)

Dombiwali Shivsena Vs BJP : डोंबिवलीत शिंदेसेना आणि भाजप यांच्यात वाद शिगेला पोहोचला आहे. रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता एकालाच किंमत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्यासमोर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

ravindra chavan

ravindra chavan

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डोंबिवलीत भाजप व शिंदेसेना आमनेसामने 

point

रवींद्र चव्हाण यांच्यासमोर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

Shivsena Vs BJP : शिंदेसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधील वाद हा कुठेतरी शिगेला पोहोचलेला दिसत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन नंबरला किंमत नसते म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टीका केली आहे. त्यानंतर डोंबिवलीत कुंभारखाणा परिसरातील गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावेळी भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला होता. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली, त्यानंतर घटनास्थळी तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ठाण्यात मनसेला मोठा धक्का, भाजपने जिल्हाध्यक्ष फोडला; निवडणुकीच्या तोंडावर अनेक माजी नगरसेवकही गळाला

भाजप व शिंदेसेना आमनेसामने 

उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भाजप व शिंदेसेना आमनेसामने आले आहेत. अलीकडेच शिंदेसेनेत प्रवेश केलेले विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन केलं. याचमुळे आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

रवींद्र चव्हाण यांच्यासमोर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

अशातच शिवसेना कार्यकर्त्यांनी आरोप केला की, विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्या स्वागताचे बॅनर जाणूनबुजून झाकण्यात आले. याच उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. याच उद्घाटनावेळी रवींद्र चव्हाण यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्यासमोरच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत घोषणाबाजी केली.  

हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीतील लोकांना आपले प्रेम मिळणार, 'त्या' व्यक्तीची भेटगाठ होऊन दिवस सार्थकी जाणार

त्यानंतर, भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिलं. उद्घाटनासारख्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या बॅनरबाजी, घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे.