Sanjay Nirupam : भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांची काँग्रेसच्या संजय निरूपमांनी का घेतली भेट?

प्रशांत गोमाणे

13 Mar 2024 (अपडेटेड: 21 Mar 2024, 05:22 PM)

Sanjay nirupam meet Ashok chavan : काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या संजय निरूपम यांनी काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या अशोक चव्हाणांची भेट घेतली होती. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या तोंडावर संजय निरूपम यांनी चव्हाणांची घेतलेली भेट अनेक गोष्टींचे संकेत देत आहेत.

sanjay nirupam meet ashok chavan udhhav thackeray amol kirtikar north west mumbai lok sabha constituency maha vikas aghadi seat sharing

काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या संजय निरूपम यांनी काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या अशोक चव्हाणांची भेट घेतली होती.

follow google news

Sanjay nirupam meet Ashok chavan : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने बैठकांचा धडाका लावला आहे. मात्र अद्याप जागावाटप अंतिम झाले नाही. असे असतानाच काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या संजय निरूपम यांनी काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या अशोक चव्हाणांची भेट घेतली होती. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या तोंडावर संजय निरूपम यांनी चव्हाणांची घेतलेली भेट अनेक गोष्टींचे संकेत देत आहेत. त्यामुळे या भेटीमागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेऊयात. (sanjay nirupam meet ashok chavan udhhav thackeray amol kirtikar north west mumbai lok sabha constituency maha vikas aghadi seat sharing) 

हे वाचलं का?

काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी नुकतीच भाजपमध्ये प्रवेश केलल्या अशोक चव्हाणांची गुप्त भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर बोलताना संजय निरूपम म्हणाले की, ''अशोक चव्हाण माझे जुने मित्र आहेत.मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तिकडे गेलो होतो. त्यावेळी आमची भेट झाली होती. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. कारण आमच्या भेटी होत असतात'', असे निरूपम म्हणाले होते. तर ''माझे आणि काँग्रेसचे जुने संबंध आहेत,त्यामुळे भेट होत असते'', असे अशोक चव्हाण यांनी या भेटीवर म्हटलं होतं. दरम्यान दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया येऊन सुद्धा चर्चा काय थांबायच नाव घेत नाही आहेत.

हे ही वाचा : Bharat Jodo : महाराष्ट्रात येताच राहुल गांधींनी महिलांसाठी केल्या 5 मोठ्या घोषणा 

निरूपमांच्या नाराजीचं कारण काय?

खरं तर काँग्रेसमध्ये संजय निरूपम नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीचे कारण ठरले आहेत उद्धव ठाकरे. कारण काहीच दिवसांपुर्वी मुंबईतील शांखाना भेटी देताना ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकरच्या नावाची घोषणा केली होती. विशेष म्हणजे अद्याप महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम झालं नव्हतं. त्याआधी ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्याने निरूपम चांगलेच भडकले होते. कोरोना काळात गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीची उमेदवारी जाहीर करण्याची इतकी घाई काय? आणि अशा घोटाळेबाज उमेदवाराचे शिवसेना आणि काँग्रेस करणार का? असा सवाल निरूपमांनी ठाकरेंना केला होता. 

दरम्यान ठाकरेंच्या या उमेदवारीवरून सजंय निरूपम आणि वर्षा गायकवाड वगळता काँग्रेसकडून फारसा विरोध झाला नाही. त्यामुळेच संजय निरूपम नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीतून त्यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. आता या भेटीनंतर ते कोणता दुसार पर्याय निवडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

    follow whatsapp