Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder Case, ठाणे : ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मनोरमानगर परिसरात त्यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. हेल्मेट आणि मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : गर्भवती काकीसोबत लिव्ह इनमध्ये रहायचा, तरुणाला वेगळाच संशय आला अन् घडंल थरारक हत्याकांड
गोळीबारासोबतच धारदार शस्त्रानेही हल्ला करुन शिवसैनिकांची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी दोन हल्लेखोर कार्यालयात घुसले. त्यांनी पूर्णेकर यांच्यावर अनेक राऊंड गोळीबार केला. यातील दोन गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. गोळीबारासोबतच त्यांच्यावर धारदार शस्त्रानेही हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हल्लेखोरांनी हेल्मेट आणि मास्क घातले असल्याने त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या हल्ल्यात नेमके किती जण सहभागी होते आणि त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची शस्त्रे होती, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हेही वाचा : ठाणे हादरलं, ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांची गोळ्या झाडून हत्या, प्रदीप पुर्णेकरांना क्रूरपणे संपवलं
डीसीपी प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण पाच संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. यामध्ये निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि एका अज्ञात आरोपीचा समावेश आहे. यापैकी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघांची चौकशी सुरू असून हत्येमागचं कारण आणि या घटनेतील त्यांची भूमिका तपासली जात आहे. उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासोबतच हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींबाबतही पोलीस तपास करत आहेत.
देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे - संजय राऊतांचा संताप
या प्रकरणावर बोलताना ठाकरेंचे खासदार संजय राऊत म्हणाले, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. प्रदीप पुर्णेकर हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक होते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास होता. बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारे होते. त्यांची काल निर्घुणपणे गोळ्या झाडून हत्या झाली. ठाणे हे गुन्हेगारांचा अड्डा आणि आश्रयस्थान बनलंय. या राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे. त्यांना प्रश्न कराल तर ते 10 वर्षांपूर्वीचे आकडे देतील. ठाण्यामध्ये एका महिन्यात पाच लोकांच्या हत्या झाल्या आहे. या सप्टेंबर महिन्यात हे झालंय. 25 सप्टेंबरला एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाली. ते वर्दीमध्ये होते. किसन भोईर असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे. पेट्रोलिंग करत असताना त्यांची हत्या झाली. काल पुर्णेकरांची हत्या झाली. त्याआधी 4 हत्या झाल्या आहेत. वारंवार ही मालिका सुरु आहे. गृहखाते काय करत आहेत? पोलीस आयुक्त हे मंत्र्यांचे घरगडी आहेत. ठाण्यात गृहखात्याची रेंज पोहोचत नाही का? पुर्णेकरांचा फार थोड्या मतांनी पराभूत झाला. शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात त्यांचा राजकीय संघर्ष सुरू होता,स्थानिक मनोरमा नगर येथे बिल्डर लॉबी आणि ड्रग्स नेटवर्क विरुद्ध ते सतत आवाज उठवत होते. त्याची किंमत त्यांनी जिवाचे मोल देऊन चुकवली आहे. याची लाज महाराष्ट्राचे गृहमंत्रिपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना वाटली पाहिजे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, माझी भाषा झोंबेल पण पुर्णेकरांच्या घरातील आकांत जाऊन पाहा. पोलीस आयुक्तांना ताबोडतोब तेथून काढायला पाहिजे. ठाण्यातील पोलीस 12-12 वर्ष तिथे बसले आहेत. कोणाच्या आशीर्वादाने बसले आहेत? गृहमंत्री नौटंकी करणार नसतील तर ताबोडतोब कारवाई करावी. अन्यथा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा. ठाण्यामध्ये कायदा सुवस्थेच्या बाबतीत हस्तक्षेप करत नसाल तुमची लज्जास्पद गृहमंत्री म्हणून तुमची इतिहासात नोंद राहिलं. ठाणे हे गुन्हेगारांचे,ड्रग्स माफियांचे आश्रयस्थान बनले आहे, देवेंद्र फडणवीसांचे हे अपयश असून ठाणेकरांचे भविष्य अंधारात ढकलले आहे. प्रदीप पूर्णकरांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही.
ADVERTISEMENT












