Sanjay Raut : "पक्ष सोडला नाही तर तुरूंगात जावे लागेल", राऊतांचा चव्हाणांबद्दल मोठा दावा

मुंबई तक

07 Apr 2024 (अपडेटेड: 07 Apr 2024, 10:12 AM)

Sanjay Raut On Ashok Chavan : खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांबद्दल एक मोठं विधान केलं आहे.

संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्याबद्दल केलेल्या विधानाची आता चर्चा होत आहे.

संजय राऊत यांचे अशोक चव्हाणांबद्दल विधान.

follow google news

Sanjay Raut, Ashok Chavan, Maharashtra Politics : भारत जोडो यात्रेच्या मुंबईत झालेल्या समारोपावेळी राहुल गांधींनी अशोक चव्हाणांबद्दल नाव न घेता मोठा गौप्यस्फोट केला होता. आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही असेच विधान केल्याने या चर्चेला नव्याने तोंड फुटले आहे. (Sanjay Raut Claims That Ashok Chavan cried in front of Sonia Gandhi, Mallikarjun kharge and rahul gandhi)

हे वाचलं का?

'असे हे आदर्श नेते' असा उल्लेख संजय राऊतांनी केला आहे आणि ते सोनिया गांधी, मल्लिकार्जून खरगे व राहुल गांधी यांच्यासमोर रडले, असे म्हटले आहे. 

संजय राऊत यांनी सामनात प्रसिद्ध होणाऱ्या 'रोखठोक' या सदरात 'नेभळट डरपोकांच्या देशात' असा लेख लिहिला आहे. या लेखात राऊतांनी अशोक चव्हाण यांचे थेट नाव घेतले नसले, तरी आर्दश नेते म्हणत निशाणा साधला आहे. 

संजय राऊतांनी अशोक चव्हाणांबद्दल काय लिहिलं आहे?

लेखात संजय राऊतांनी म्हटले आहे की, "काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते भाजपत सामील झाले. ईडी, सीबीआयच्या भीतीने लटपटले व भाजपत गेले. हे आदर्श नेते दिल्लीत जाऊन सोनिया गांधी, मल्लिकार्जून खरगे व राहुल गांधी यांच्यासमोर जाऊ रडले व 'पक्ष सोडला नाही तर तुरुंगात जावे लागेल. तुरुंगात जाण्याची माझी इच्छा नाही', असे हात जोडून सांगितले व हे आदर्श नेते काँग्रेस सोडून भाजपत गेले."

हेही वाचा >>  खरंच अशोक चव्हाण सोनिया गांधींसमोर रडले का?

राऊत पुढे म्हणतात की, "अशा अनेक डरपोक लोकांना प्रवेश देऊन भाजपने काय साध्य केले? या देशातील भोंगळ राजकारण यापुढे बंद पाडले पाहिजे. कारण देश अशा एका टप्प्यावर आला आहे की, ज्याला मूलभूत क्रांतिकारक बदल हवा आहे. त्याला व्यक्तिद्वेषाचे आणि बदल्याचे राजकारण नको", असे मत संजय राऊत यांनी मांडले आहे.

    follow whatsapp