Yavatmal : संजय राऊतांविरुद्ध पोलिसांनी दाखल केला गुन्हा, प्रकरण काय?

प्रशांत गोमाणे

• 06:21 AM • 12 Dec 2023

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी रोखठोक सदरात पाच राज्यातील विधानसभा निवडूकीच्या निकालाचे विश्लेषण केले होते. या निकालाचे विष्लेषण करताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक विधाने केल्याचे नितीन भुतडा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

sanjay raut thackeray mp case register on yavatmal umarkhed police Samana criticize pm narendra modi

sanjay raut thackeray mp case register on yavatmal umarkhed police Samana criticize pm narendra modi

follow google news

Case Register Against Sanjay Raut Yavatmal : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळच्या (Yavatmal) उमरखेड पोलीस ठाण्यात (Umarkhed Police Station) राऊतांवर गुन्हा दाखल झाला आहे. भाजपाच्या नितीन भुतडांनी (Nitin Bhutada) राऊतांविरूद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आता राऊतांविरोधात कलम 153A, 505(2) आणि 124 – A नुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान नेमकं हे प्रकरण काय आहे? त्यांच्यावर कोणत्या आरोपांखाली गुन्हा दाखल झाला आहे. हे जाणून घेऊयात. (sanjay raut thackeray mp case register on yavatmal umarkhed police Samana criticize pm narendra modi)

हे वाचलं का?

सामना या वृत्तपत्रातून देशविरोधी व्यक्तव्य करित देशाचे पंतप्रधानांची बदनामी केल्याचा आरोप करित भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळच्या उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर खासदार संजय राऊतांवर कलम 153_A 505(2) आणि 124 – A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : ‘हात-पाय तोडून गोळ्या घाला’, माजी आमदाराच्या गुंडागर्दीचा व्हिडीओ व्हायरल

FIR मध्ये काय?

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी रोखठोक सदरात पाच राज्यातील विधानसभा निवडूकीच्या निकालाचे विश्लेषण केले होते. या निवडणूकीत भाजपने तीन राज्यात बहुमत मिळवत सत्ता स्थापण केली. या निकालाचे विष्लेषण करताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक विधाने केल्याचे नितीन भुतडा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय झाला असता तर 2024 च्या निवडणुकीआधी मोंदीनी पाकिस्तानशी संगनमत करून एखादा बॉम्ब टाकला असता. एखादा पुलवामा घडताना उघड्या डोळ्यांनी पाहिले असते. जवानांच्या शवपेट्यांना वंदन करणारी छायाचित्रे घेऊन फिरवून आपल्यासारखे आपणच,दुसरे कोणीही नाही, हे ठसविण्याचा प्रयत्न केला असता असे राऊत यांनी रोखठोकमध्ये लिहले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींवरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून त्यांची प्रतिमा मलीन करणारे आहेत. त्यामुळे संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे नितीन भुतडा यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून आता संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला आहे.

    follow whatsapp