Ajit Pawar:मोदींकडून मोठी ऑफर?, Sharad Pawar यांनी अजितदादांना दाखवली जागा!

रोहित गोळे

16 Aug 2023 (अपडेटेड: 16 Aug 2023, 02:34 PM)

अजित पवार हे भाजपच्या वतीने कृषीमंत्री पदाची ऑफर घेऊन आले होते. या वृत्ताचं शरद पवार यांनी खंडन केलं आहे. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

sharad pawar has denied agriculture minister offer from ajit pawar a big statement was made regarding the secret meeting in pune

sharad pawar has denied agriculture minister offer from ajit pawar a big statement was made regarding the secret meeting in pune

follow google news

Sharad Pawar meet Ajit Pawar: बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात शनिवारी (12 ऑगस्ट) पुण्यात एक गुप्त भेट झाली होती. याच भेटीबाबत आता वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. अशातच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी असं विधान केलं होतं की, शरद पवारांनी भाजपसोबत यावं आणि केंद्रात कृषीमंत्री (agriculture minister)पद स्वीकारावं. अशी ऑफर घेऊन अजित पवार भेटले होते. याचबाबत आज (16 ऑगस्ट) शरद पवार यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत बोलताना मोठं विधान केलं आहे. (sharad pawar has denied agriculture minister offer from ajit pawar a big statement was made regarding the secret meeting in pune)

हे वाचलं का?

‘या बैठकीत आम्ही राजकीय चर्चाच केली नाही. आणि असं आहे की, माझ्याशी कोण चर्चा करणार?’ असं म्हणत शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटलं की, अजित पवार हे मला ऑफर देण्याऐवढे मोठे नाहीत.

गुप्त भेट अन् शरद पवारांचं मोठं वक्तव्य

अजित पवार कृषीमंत्री पदाची ऑफर घेऊन आले होते का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘ती जी काही गुप्त बैठक होती असं तुम्ही म्हणता.. त्यामध्ये असल्या गोष्टीची काही चर्चा झाली नाही. ही गोष्ट मी जाहीरपणाने सांगितली.. भेट झाली नाही असं नाही.. ते मला भेटायला आले होते.’

‘पवार कुटुंबातील एकंदर जे काही आम्ही भाऊ-बहीण आहोत त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून… कुठल्याही कौटुंबिक प्रश्न असेल तर त्यासंबंधी माझ्या कुटुंबात एक पद्धत आहे की, बोलायचं किंवा माझा सल्ला घ्यायचा.. त्यामुळे त्याबाबत अधिक काही अर्थ काढायचा अर्थ नाही.’

हे ही वाचा >> Crime: प्रेमविवाह करून घरी आणलेल्या सुनेने उद्योजक सासऱ्याला संपवलं?, हादरवून टाकणारी कहाणी

‘या बैठकीत आम्ही राजकीय चर्चाच केली नाही. आणि असं आहे की, माझ्याशी कोण चर्चा करणार? मला असं वाटतं की, ज्या पक्षात हे सर्व लोक होते त्या पक्षाचा संस्थापक कोण आहे, त्या पक्षाचा वरिष्ठ व्यक्ती कोण आहे? त्यामध्ये आणखी चर्चा करायला कोणी तरी येईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्याला अधिक महत्त्व देण्याचं कारण नाही.’ असं म्हणत शरद पवारांनी कृषीमंत्री पदाच्या ऑफरचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

‘लहान लोकांच्याबद्दल मी भाष्य करत नाही..’

‘मी त्या दिवशी माध्यमांच्या समोरून गेलो.. माझ्या गाडीची काच खाली होती. मी फुलं देखील स्वीकारली.. नंतर मी गेलो.. मला काय भीती? त्यामुळे इथे मी माझ्यापुरतं सांगू शकतो.. बाकी लहान लोकांच्याबद्दल मी भाष्य करत नाही.’

‘असं आहे की, अजित पवारांच्या घरामध्ये दोन मुलांची लग्न व्हायची आहेत. त्याला वेळ आहे अजून.. जवळपास ते 30-32 वयाचे झालेले आहेत. त्यामुळे त्यासंबंधीची घरात चर्चा झाली तर 100 टक्के मलाही विचारतील.’

‘अशावेळेला कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी तिथे राजकारण आणत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेक वर्ष होतो. तिथे आमचे जे विरोधक होते. त्यात एक शक्तीशाली विरोधक होते. त्यांचं नाव एन. डी. पाटील.. आता त्यांची बायको जी आहे ती माझी बहीण सख्खी.. पण सभागृहात आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. पण त्यांच्या घरात काही कौटुंबिक काम असेल तर मी गेलो नाही असं नाही ना..’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.

‘भाजपसोबत आजही जाणार नाही, अन् उद्याही…’

‘आमची भूमिका स्वच्छ आहे की, आम्ही भाजपसोबत जाण्याची भूमिका घेणारे जे असतील ते आमचे नव्हेत. आम्ही भाजपशीसंबंधित नाही आणि उद्याही राहणार नाहीत.’

हे ही वाचा >> शरद पवारांना मोठी ऑफर? काँग्रेस, शिवसेना (UBT) टेन्शनमध्ये, काय शिजतंय?

‘मला सोबत घेण्याचा प्रयत्न अजिबात कोणी केलेला नाही. तुम्ही सांगता त्यांच्याकडून राजकीय निर्णय घेण्याची स्थिती माझी आलेली आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही.’ असं स्पष्टीकरण शरद पवारांनी पुन्हा दिलं आहे.

    follow whatsapp