Nitish Kumar : बिहारमध्ये भूकंप घडणार? शरद पवार यांनी काय केलं भविष्य

प्रशांत गोमाणे

• 12:08 PM • 27 Jan 2024

आम्ही लोकांनी मिळून सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्याची बैठकही महाराष्ट्रात ठरवली आणि त्यामध्ये पुढाकार घ्यायला बिहारचे मुख्यमंत्री आले होते. पण आता एक-दोन महिन्यात असं काही झालं माहिती नाही, त्यांच्या डोक्यामध्ये आता दुसरा विचार आला असल्याचे शरद पवार सांगतात.

sharad pawar reaction on nitish kumar bihar politics india alliance mamta banerjee

sharad pawar reaction on nitish kumar bihar politics india alliance mamta banerjee

follow google news

Sharad Pawar Reaction On Bihar Politics, Nitish Kumar : बिहारमध्ये मोठा राजकीय संघर्ष सूरू झाला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar)  पुन्हा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीला लागले आहे. या संदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे जर नितीश कुमार भाजपात गेल्यास इंडिया आघाडीला हा मोठा धक्का असणार आहे. बिहारमधील या घडामोडीवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक-दोन महिन्यात असं काही झालं माहिती नाही, पण त्यांच्या डोक्यामध्ये आता दुसरा विचार सूरू झाला आहे. त्यामुळे आता देशामध्ये पर्यायी शक्ती उभी करणे, यासाठी आमचे प्रयत्न सूरू झाले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. (sharad pawar reaction on nitish kumar bihar politics india alliance mamta banerjee)

हे वाचलं का?

शरद पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी बिहारमधील घडामोडीवर शरद पवार म्हणाले की, आम्ही लोकांनी मिळून सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्याची बैठकही महाराष्ट्रात ठरवली आणि त्यामध्ये पुढाकार घ्यायला बिहारचे मुख्यमंत्री आले होते. पण आता एक-दोन महिन्यात असं काही झालं माहिती नाही, त्यांच्या डोक्यामध्ये आता दुसरा विचार आला असल्याचे शरद पवार सांगतात. पण जरी असे असले तरी देशामध्ये पर्यायी शक्ती उभी करणे, यासाठी आमचे प्रयत्न सूरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच देशात सत्तेचा गैरवापर होतोय पण आपण जर एकत्र असलो तर ते आपल्यासमोर टीकाव धरू शकत नाही, असे देखील शरद पवार स्पष्टच सांगितले.

हे ही वाचा : Gunaratna Sadavarte : “दिशाभूल करू नका”, सदावर्ते जरांगेंवर भडकले; सगेसोयरेचा घोळ काय?

नितीश कुमार हे इंडिया आघाडीचा भाग आहेत. अशा स्थितीत ते भाजपमध्ये जाणे हे इंडिया आघाडीसाठी मोठी समस्या ठरू शकते. बिहारमध्ये इंडिया आघाडीच्या 40 जागा आहेत. दरम्यान याआधी इंडिया आघाडीत असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील ‘एकला चलो’चा नारा दिला होता. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने कोणतीही जागावाटप न करता लोकसभेच्या 42 जागा एकट्याने लढवण्याची घोषणा केली होती. त्याआधी पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने देखील एकट्याने लोकसभेच्या 13 जागा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान प्रमुख नेत्यांच्या या निर्णय़ामुळे इंडिया आघाडी खिळखिळी होत चालली आहे. तसचे लोकसभा निवडणूकीपर्यंत आता इंडिया आघाडी एकजूट राहते की नाही, हे देखील पाहावे लागणार आहे.

हे ही वाचा : Manoj Jarange : ओबीसी नेत्यानेच ‘सगेसोयरे’ गोंधळ केला दूर, सांगितलं खरं काय?

 

    follow whatsapp