NCP : ‘ज्यांना मोठं केलं त्यांनीच…’ शरद पवारांचा अजित ‘दादां’वर पलटवार

मुंबई तक

• 11:09 AM • 02 Dec 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरूण कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या सर्व तरूण कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला.

sharad pawar reply ajit pawar on yb center resignation ncp crisis maharashtra politics

sharad pawar reply ajit pawar on yb center resignation ncp crisis maharashtra politics

follow google news

Sharad Pawar Criticize Ajit Pawar : उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी कर्जतमधल्या दोन दिवसीय शिबिराच्या समारोपात शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार हल्ला चढवला. तुम्ही आम्हाला गाफील ठेवलं. तसेच राजीनामा मागे घेण्यासाठी नंतर त्यांनीच कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. अजित पवारांच्या या आरोपावर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. कुणी गेले तर त्याची चिंता करण्याची गरज नाही, आता संघटना स्वच्छ व्हायला लागली, अशा शब्दात शरद पवारांनी अजित दादांना सुनावले आहे. (sharad pawar reply ajit pawar on yb center resignation ncp crisis maharashtra politics)

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरूण कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या सर्व तरूण कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला. कुणी गेले तर त्याची चिंता करण्याची गरज नाही, आता संघटना स्वच्छ व्हायला लागली, असे विधान करून शरद पवारांनी अजित दादांना सुनावले आहे.

हे ही वाचा :Animal : रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, पहिल्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

आता नवीन लोकांना संधी मिळेल अशी पक्षात परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अधिक लोक असतील. त्यामुळे आता कष्ट केले पाहिजे, संपर्क वाढवला पाहिजे, संघटना मजबूत केली पाहिजे आणि आपला विचार शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवा. अनेक गोष्टी आहेत त्यासाठी कामाला लागा, असा कानमंत्र शरद पवारांनी तरूण कार्यकर्त्यांना दिला.

आज त्यांच्याकडून (अजित पवार गटाकडून) आपल्यावर टीका टिपण्णी होत आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपलं लक्ष विचलित करण्यासाठी आपल्यावर हल्ले केले जात असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले. सत्ता येते आणि जाते…पण सत्ता गेल्यावर नव्या ऊर्जेने उभं राहण्याची काळजी घेतली तर सत्ता परत येते. आपण संधीसाधू नाही, जनतेला आणि तरुण पिढीला सांगावं लागेल, असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा :Khichdi Scam : खिचडी घोटाळ्यातील ‘ती’ कंपनी शिंदेंच्या नेत्याची! वाचा Inside Story

तसेच जे मतदारसंघ पक्षाने ठरवले आहेत, त्या ठिकाणी जाऊन ती जागा आपण घेणारच अशी पावले आपण टाकली पाहिजेत. लोकसभा निवडणूक तीन चार महिन्यावर येईल. ती संपल्यावर विधानसभा निवडणूक आठ दहा महिन्यावर आली आहे, असे देखील शरद पवार यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp