Shiv sena UBT: वरूण सरदेसाईंचं तिकीट झालं पक्कं, ठाकरेंनी मतदारसंघही ठरवला!

ऋत्विक भालेकर

05 Dec 2023 (अपडेटेड: 05 Dec 2023, 06:03 AM)

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सुभाष देसाई आणि अनंत गीते या नेत्यांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार विलास पोतनीस यांच्या जागेवर तरुण नेतृत्व देण्यावर नेत्यांचे बैठकीत एकमत झाले होते.

shiv sena ubt candidate declare varun desai kishor jain graduate constituency election Uddhav thackeray

shiv sena ubt candidate declare varun desai kishor jain graduate constituency election Uddhav thackeray

follow google news

Shiv Sena Thackeray Group Varun Desai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) गटाकडून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून वरून सरदेसाई (varun sardesai) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात येणार आहे. तर कोकण मतदारसंघातून किशोर जैन (kishor Jain) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाली असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. (shiv sena ubt candidate declare varun desai kishor jain graduate constituency election Uddhav thackeray)

हे वाचलं का?

पदवीधर मतदारसंघांसाठी 2018 ला निवडणूका पार पडल्या होत्या. त्यामुळे आता उमेदवारांची टर्म संपत असल्याने लवकरच निवडणूका जाहीर होणार आहेत. या निवडणूकीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सुभाष देसाई आणि अनंत गीते या नेत्यांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार विलास पोतनीस यांच्या जागेवर तरुण नेतृत्व देण्यावर नेत्यांचे बैठकीत एकमत झाले होते. त्यामुळे आता मुंबई पदवीधर मतदारसंघातून वरून सरदेसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे निश्चित झाले आहे.

हे ही वाचा : Chandrayaan 3 Returns Home : ‘चांद्रयान 3’ ची घरवापसी! ‘इस्त्रो’चा ‘हा’ मोठा प्रयोग यशस्वी

वरूण सरदेसाई हे युवासेनेचे सचिव आहेत. त्यांचे नाव कायम चर्चेत होते. कारण मुंबईत वरूण सरदेसाई यांनी अनेक आंदोलने यशस्वी करून दाखवली आहेत. या आंदोनामुळे आणि त्यांच्या विधानामुळे ते नेहमीच विरोधकांच्या निशाण्यावर असायचे. त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे आता त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याची माहिती आहे.

कोकण मतदारसंघातून निरंजन डावखरे यांच्या विरोधात कोकणातील ठाकरे गटाचे सह संपर्क प्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू शिवसैनिक किशोर जैन यांच्या नावाची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या कोकण खळा बैठक दौऱ्याची जबाबदारी किशोर जैन यांच्यावर होती.

उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात मुंबईतील विभागप्रमुख आणि रायगड मधल्या पदाधिकाऱ्यांच्याही मातोश्रीवर बैठका पार पडल्या आहेत. या बैठकीत उमेदवारांसाठी तयारीला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

सरदेसाईं विरोधात मुख्यमंत्री शिंदेंचा ‘हा’ नेता मैदानात

मुंबई पदवीधर मतदार संघातून ठाकरे गटाकडून वरून सरदेसाई निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आता वरून सरदेसाईं यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारही ठरला आहे. वरून सरदेसाईंच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेतून माजी मंत्री दीपक सावंत निवडणूकीच्या रिंगणात असणार आहे. त्यामुळे आता वरून सरदेसाई यांच्यासमोर दीपक सावंत
यांचे आव्हान असणार आहे.

हे ही वाचा : Cyclone: मिचॉन्ग चक्रीवादळाचा चेन्नईत हैदोस; 5 जणांचा मृत्यू! दक्षिणेकडील राज्यांना रेड अलर्ट

दरम्यान या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत या याद्यांवर हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यावरील सुनावणीनंतर 30 डिसेंबर 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

    follow whatsapp