Sushma Andhare On Neelam Gorhe : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबाबत खळबळजनक विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अंधारे म्हणाल्या, "'गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात एसएफआयमधून केली. नंतर भारिपमध्ये उडी मारली. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे त्यांना ओळख मिळाली. ईमानदारी, प्रामाणिकपणा त्यांच्या शब्दकोशात नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांनी बेइमानी केली. पवार साहेबांकडे आणि त्यांच्या पक्षाशी बेइमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या. त्या जिथे राहतात त्यांनी एक ढाका उभी केली नाही, लोकांना कसे बाजूला ठेवता येईल हे त्यांनी केलं.
ADVERTISEMENT
2017 ते 2022 पर्यंत त्यांनी माझ्या पक्षात प्रवेश होऊ दिला नाही. दोन मर्सिडीज दिल्या असं म्हणत असतील, तर त्यांनी त्यांच्या 2 मर्सिडीज कुठून आणल्या? त्यांची कुठली मालमत्ता आहे, जी 250 कोटींची आहे. त्यांची मालमत्ता आता तपासावी लागेल. साहित्य संमेलनमध्ये ज्याला बोलावलं जातं, त्याचा किमान चारोळी लिहली असावी मग, त्यांना तिथे कशाला बोलावलं होतं?" असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंवर हल्लाबोल केला आहे.
हे ही वाचा >> "प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवर काही लोकांनी टीका केली, पण...", CM देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना स्पष्टच सांगितलं
"साहित्य मंडळाने त्यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण कशाचे दिले होते. शिवसेनेवर बोलण्याचा प्रयत्न अतिशय केविळवाणा आहे. गोऱ्हे यांच्यासारखा व्यक्तीला पैशाची कदर नाही. त्यांनी अनेक पदं भूषवली म्हणजे अनेक मर्सिडीजची किंमत त्यात होती. हा अब्रू नुकसानीचा दावा किती असेल, त्याची रक्कम किती असेल, हे संध्याकाळपर्यंत कळवले जाईल. एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनाच माहिती असेल की कलेक्शन किती होतं..निलम गोऱ्हे यांनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर करावे नाहीतर नाक घासून माफी मागावी. निलम गोऱ्हे यांनी कर्तृत्व नसताना अनेक पदं भूषवली. मला वेळ आणू नका, भारिप मध्ये असताना तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी काय काय केलं मला या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील, असंही अंधारे म्हणाल्या.
हे ही वाचा >> 24 february 2025 Gold Rate : आजही सोनं गडगडलं! मुंबईसह 'या' शहरांतील सोन्या-चांदीचे भाव वाचून डोकंच धराल
"राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे भाऊ आहेत. हे कौटुंबिक नातं आहे ते कितीही वेळा एकत्र येऊ शकतात. ते 3 नाही 33 वेळा भेटू देत. त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. इतर पक्ष गोऱ्हे यांच्यावर का नाही बोलत, यावर अंधारे म्हणाल्या, "मला अपेक्षा नाही की कोणी त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी नाही द्यावी. राष्ट्रवादी, काँग्रेस काय बोलते याची वाट बघणार्यांपैकी आम्ही नाही. ज्यांना त्याचसोबत मंच शेअर करायचे आहेत, त्यांचा पाहुणचार, स्तुती सुमने करायची आहेत ते करू देत. आमची लढाई लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत", असं मोठं विधानही सुषमा अंधारे यांनी केलंय.
ADVERTISEMENT











