Sanjay Raut Mumbai Tak Chavdi Interview : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यानंतर अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याने राज्याच्या राजकारणात नवी पालवी फुटेल, अशा चर्चांना उधाण आलं. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबत मुंबई तकच्या चावडीत मोठं विधान केलं.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्याबाबत संजय राऊत काय म्हणाले?
तुम्हाला असं वाटतं का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं? तुम्ही प्रयत्न का नाही करत? यावर संजय राऊत म्हणाले, मला नक्कीच वाटतं. दोन भावांच्या मध्ये आपण प्रयत्न करणं, म्हणजे वाद नको. दोघेही आमचे मित्र आहेत. दोन भावांना बोलण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही. दोन भाऊ आहेत. मला पूर्ण खात्री आहे, योग्य वेळी तुमच्यापर्यंत चांगली माहिती येईल. उद्धव ठाकरेंनी चार तासात प्रतिसाद दिला. आम्ही सगळे वाद मिटवून एकत्र यायला तयार आहोत, असं उद्धव ठाकरे बोलले. राज ठाकरेंनी साथ घातली, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. अजून काय पाहिजे..मला असं वाटतं की, हा दोन भावांमधील प्रश्न आहे. तो दोन भावांमध्येच राहूद्या. दोन भावांना संपवूद्या.
हे ही वाचा >> Shakti Cyclone: नवं संकट! 'शक्ती' चक्रीवादळ येतंय, महाराष्ट्राच्या 'या' भागांना धोका!
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, लोकांनी शिवसेना पक्ष सोडला ही पहिली गोष्ट नाही. यापूर्वीही अनेक लोकांनी पक्ष सोडलेले आहेत. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे..एकनाथ शिंदे फार मोठे नेते नाहीत. ज्यांचं आम्हाला आव्हान आहे. एकनाथ शिंदेचं बळ कशात आहे..एकनाथ शिंदेचा पक्ष अमित शाहांच्या मालकीचा आहे. अमित शाहांना ज्या दिवशी वाटेल, त्या दिवशी ते पक्ष बंद करतील. एकनाथ शिंदेंच बळ यात आहे की, बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना, अमित शाहांनी त्यांच्या हातात दिली. मूळ पक्ष, मूळ चिन्ह ही त्यांची ताकद आहे.
"एकनाथ शिंदे जर खरे नेते असतील, तर त्यांनी स्वत:चा स्वतंत्र पक्ष स्थापन करावा. स्वत:चं चिन्ह घ्यावं आणि निवडणुका लढवून दाखवाव्या. त्यात जर ते यशस्वी झाले, तर मी मान्य करेल एकनाथ शिंदे या देशातले खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या तोडीचा नेता या महाराष्ट्रात नाही. पण तसं नाहीय. ज्या शिवसेनेच्या स्थापनेशी आणि वाढीशी तुमचा काहीही संबंध नाही. तुम्ही ठाकरेंचे आश्रित होता..
हे ही वाचा >> बापरे... हेअर ट्रान्सप्लांट केला अन् दोघांचा जीव गेला, डॉ. अनुष्काने असं केलं तरी काय?
तुम्हाला ठाकरे कुटुंबानं किंवा शिवसेनेनं घडवंल आणि अमित शाहांच्या मेहेरबानीनं किंवा त्यांच्या कारस्थानानं एक पक्ष पळवला आणि आपल्या मालकीचा केला. तुम्ही चिन्ह घेतलं. हा अत्यंत अमानूष प्रकार आहे की, बाळासाहेबांची शिवसेना ही माझी शिवसेना सांगायची. दुसऱ्यांचा आईबाप माझा आईबाप सांगायचं. तुमचा पक्ष काढा ना एक..तुम्ही सक्सेस झालात तर तुमची लिडरशीप मान्य करू आम्ही", असंही राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
