Suresh Dhas Press Conference : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या 30 जानेवारीला बीडच्या डीपीडीसीची बैठक घेणार आहेत. यावेळी मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहे. धस यांनी पत्रकार परिषदेत डीपीडीसीच्या याआधीच्या बोगल बिलांच्या फायली समोर आणल्या. यावेळी धस यांनी बोगस बिलांची थेट आकडेवारीच सांगितली. धस म्हणाले, बोगस उचललेली बिले...जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीडीसी..सन 2021-22 मध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री होते. परळी आणि आंबेजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यावधी रुपयांची बिले उचललीत.
ADVERTISEMENT
सुरेश धस पुढे म्हणाले, "दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई 2 कोटी 31 लाख..18 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड 10 कोटी 98 लाख..दिनांक 25 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई 6 कोटी 59 लाख..26 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक 2 मध्ये 16 कोटी 48 लाख रुपये आणि 31 मार्च 2022 कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड 1 कोटी 34 लाख असे एकूण 37 कोटी 70 लाख रुपये..या कामांची बोगस बीले आहेत".
हे ही वाचा >> Eknath Shinde: अर्थसंकल्पाआधी DCM एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा, म्हणाले; "नागरिकांना सर्व दाखले..."
"संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवले आहेत. ते खरंतर परळीला डेप्युटी इंजिनियर होते. त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आला. 25 जून 2022 रोजी उपअभियंता संजय मुंडे सार्वजनिक विभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी चार्ज देण्यात आला. त्यांनी ही बीले उचलून दिली आहेत. कलेक्टरकडून पैसै जिल्हापरिषदेला द्यायचे. जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला डायव्हर्ट करायचे. ते पैसे 31 मार्चलाच उचलण्याची गरज नाही. ते पैसे 25 जून 2022 ला उचलले आहेत. एक रुपयाचं कामही न करता, एकाच दिवशी 37 कोटी 70 लाख रुपये उचलले. या कामाची यादीही माझ्याकडे आहे", असंही धस म्हणाले.
हे ही वाचा >> Steve Smith: स्टीव्ह स्मिथ चमकला! गावसकर, लारासह जगातील 'या' 4 दिग्गज कर्णधारांचा विक्रम मोडला
15 महिन्यांपासून महादेव मुंडेंचे गुन्हेगार सापडत नाहीत. संतोष देशमुखांना निर्घृणपणे का मारलं? कशामुळे मारला? एखाद्याला बोट लावायची सुद्धा संविधानाने तुम्हाला मुभा दिली नाही. तुम्ही इतक्या क्रूरपणे आमचा संतोष देशमुख, महादेव मुंडेला का मारला? महादेव मुंडेचे आरोपी अजून का सापडत नाहीत? असे सवालही सुरेश धस यांनी उपस्थित केले.
ADVERTISEMENT












