Eknath Shinde: अर्थसंकल्पाआधी DCM एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा, म्हणाले; "नागरिकांना सर्व दाखले..."

Eknath Shinde On DPDC Meeting: महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात प्रकल्प पुढे नेले आणि त्यांना चालना दिली. लोकाभिमुख लाडक्या बहिणींसारख्या योजना आम्ही केल्या. शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी योजना सुरु केल्या.

ADVERTISEMENT

DCM Eknath Shinde Press Conference
DCM Eknath Shinde Press Conference
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जिल्हा नियोजन बैठकीत काय चर्चा झाली

point

"त्या सर्व योजना सुरु राहणार..."

point

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde On DPDC Meeting: महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात प्रकल्प पुढे नेले आणि त्यांना चालना दिली. लोकाभिमुख लाडक्या बहिणींसारख्या योजना आम्ही केल्या. शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी योजना सुरु केल्या. त्या सर्व योजना सुरु राहणार. याचसोबत जिल्ह्याचं नियोजन आणि तेथिल विकास या सर्व गोष्टींची सांगड घातली गेली पाहिजे. ठाणे जिल्ह्याचाही विकास झाला पाहिजे. यासाठी या बैठकीत खूप विस्तृतपणे चर्चा झाली. शासन आपल्या दारी असा लोकप्रिय उपक्रम आपण राबवला. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे, सर्व दाखले एकाच छताखाली मिळाले पाहिजेत. नागरिकांना आधारकार्ड, रेशन कार्ड, जन्म मृत्यू दाखला, निवडणूक ओळखपत्र, बँक खाते, आरोग्य विमा, असे जे काही अनेक प्रकारचे दाखले मिळतात, ते दाखले मिळवण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागता कामा नये, त्यासाठी सर्व कागदपत्राचं डिजिटायजेशन झालं पाहिजे आणि लोकांना एका छताखाली याचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठीही मी सूचना दिलेल्या आहेत, अशी मोठी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, अर्थसंकल्पाच्या अगोदर महत्त्वाची जिल्हा नियोजनाची बैठक झाली. सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला. अनेक विषयांबाबत यावेळी चर्चा झाली. इतीवृत्त, अनुपाल अहवाल मान्यता, 24-25 च्या खर्चाचा आढावा झाला. 25-26 च्या प्रारुप आराखड्याला मान्यता दिली. त्याचबरोबर पाणी, शाळा, कचऱ्याची विल्हेवाट यासंदर्भातही चर्चा झाली. आरोग्य विभागाच्या संदर्भातही चर्चा झाली. माझी शाळा आदर्श शाळा करणं, शाळेची पटसंख्या वाढवणे. पीएचसीची दर्जोन्नती करणं, जेणेकरून लोकांना तिथेच सुविधा मिळतील. सांगली-सातारा जिल्ह्यातही जिल्हाधिकारी आणि सीईओने ते काम केलं. त्यामुळे त्यांना कलेक्टीव्ह म्हणून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे ही वाचा >>  Steve Smith: स्टीव्ह स्मिथ चमकला! गावसकर, लारासह जगातील 'या' 4 दिग्गज कर्णधारांचा विक्रम मोडला

कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लागली पाहिजे. सिव्हिल हॉस्पिटल, कल्याण ग्रामीण रुग्णालय असेल, शहापूरच्या पाणीपुरवठ्याचा विषय असले, आता एमएमआर वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्र, नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रात एक कोटीपेक्षा ठाणे जिल्ह्यात लोकसंख्या झालीय. त्यामुळे येथीला वाढीव गरजा लक्षात घेतल्या जात आहे. पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाबाबतही चर्चा झाली. पाणी वाढवण्यासाठी जेवढा कोटा मंजूर आहे, तेवढा कोटा मिळाला पाहिजे, यावरही चर्चा झाली आहे. रस्त्यांच्या दर्जोन्नतीवर चर्चा झाली. वाहतूक कोंडी सुटण्यासाठी कनेक्टीव्हीटी, बायपास करतोय. मेट्रोची कामे आणि इतर सर्व कामे योग्य वेळेत झाली पाहिजेत. त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे, असंही शिंदे म्हणाले. 

हे ही वाचा >> Dhananjay Munde : "...तर मी राजीनामा देणार", संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचं सर्वात मोठं विधान!