Sushma andhare on Rupali Chakankar, पुणे : "काही पीडित महिलांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीडित एका महिलेने सांगितलं की, चाकणकर बाई स्वत: तंत्र-मंत्र विद्या करायच्या. शिवाय, रुपाली चाकणकर यांनी ही विद्या करण्यासाठी स्वत:ची अनामिका कापली होती", असा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या हातांवरील बँडेज आणि जखमांचे फोटो दाखवले आहेत. त्या पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
ADVERTISEMENT
हेही वाचा : अखेर 500 वर्षानंतर योग आलाच! 'या' राशींसाठी प्रगतीचे नवे पर्व सुरु, चतुर्ग्रही राजयोग तुमच्या नशीबात आहे का?
सुषमा अंधारे म्हणाल्या, "मी या तंत्र-मंत्र विद्येबाबत अधिकची माहिती जाणून घेतली. तेव्हा लक्षात आलं की तंत्र-मंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका महत्त्वाची मानली जाते. मंत्रोच्चोराद्वारे एखाद्याला आकर्षित करुन यशप्राप्ती करणे, असा या तंत्र मंत्र विद्येचा अर्थ आहे. हे सोमवती आमवस्येलाच केले जाते. 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती आमवस्या होती. त्यानंतरच्या अनेक फोटोंमध्ये चाकणकरांच्या बोटावर बँडेज आहेत. शिवाय, चाकणकर बाई खरातांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती नाही म्हणतात मात्र, खरातांचे वडिल वारले तेव्हा चाकणकर होत्या. खरात यांच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर होत्या. खरातांची भाची चाकणकरांच्या घरात राहते. त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र मी दोन दिवसात समोर आणेन."
हेही वाचा : नियतीचा क्रूर खेळ! अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या तीन मित्रांचा दुर्दैवी अंत, दुधाच्या टँकरने चिरडले
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, कॅप्टन फाईलमधून रोज नवे खुलासे समोर येत आहेत. या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा गेल्या तीन दिवसांपासून सगळीकडे सुरु आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, "माझा व्यक्तिगत संबंध नाही. माझा फक्त ट्रस्ट पुरता संबंध होता. मला त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याची माहिती नाही." तंत्र-मंत्र, काळी जादू, अघोरी विद्या...या सगळ्या अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या उल्लंघन करणाऱ्या कृती आहेत. मी सुधारणावादी आहे, मी नवऱ्याची पूजा करत नाही, तेच माझी पूजा करतात, असं आयोगाच्या अध्यक्षा सोशल मीडियावर सांगतात. मात्र, दुसरीकडे बाबाचे केवळ पदराने पाय पुसत नाहीत, तर पायाशी अक्षरश: लोळण घेतात.
Sushma Andhare LIVE : Ashok Kharat आणि Rupali Chakankar वरुन मोठा गौप्यस्फोट | Nashik Rape Case
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Weather : राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे, 6 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचं सावट
ADVERTISEMENT











