ठाण्यात मनसेला मोठा धक्का, भाजपने जिल्हाध्यक्ष फोडला; निवडणुकीच्या तोंडावर अनेक माजी नगरसेवकही गळाला

मुंबई तक

30 Nov 2025 (अपडेटेड: 30 Nov 2025, 11:59 AM)

Thane Politics : ठाण्यात मनसेला मोठा धक्का, भाजपने जिल्हाध्यक्ष फोडला; निवडणुकीच्या तोंडावर अनेक माजी नगरसेवकही गळाला

Thane Politics

Thane Politics

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ठाण्यात मनसेला मोठा धक्का, भाजपने जिल्हाध्यक्ष फोडला;

point

निवडणुकीच्या तोंडावर अनेक माजी नगरसेवकही गळाला

डोंबिवली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी आपल्या मोठ्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करून मनसेला मोठा धक्का दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडल्याने या घटनेची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

हे वाचलं का?

गेल्या काही दिवसांपासून प्रकाश भोईर भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. स्वतः भोईर यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असली, तरी त्या वेळी त्यांनी “मी जिथे आहे तिथेच राहणार” अशी भूमिका घेतली होती. मात्र परिसरातील कार्यकर्त्यांचा आग्रह आणि आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेऊन अखेर त्यांनी मनसेला रामराम करत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : विधानसभेला आतून पाठिंबा देण्यासाठी रामभाऊ 35 कोटी देतो म्हणाला, फडणवीसांकडे घेऊन गेला : जयसिंह मोहिते पाटील

प्रकाश भोईर यांचा राजकीय प्रवासही लक्षवेधी राहिला आहे. 2015 च्या महापालिका निवडणुकीत ते आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर हे दोघेही अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला आणि पक्षात सक्रिय भूमिका बजावली. परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत भाजपाशी हातमिळवणी केली आहे. त्यांच्या सोबत माजी नगरसेविका सरोज भोईर, माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक, विभागाध्यक्ष संदीप उर्फ रमा म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांनीही कमळ हाती घेतले.

एका बाजूला मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या संभाव्य महासंधीबाबत चर्चांना वेग आला असताना, दुसरीकडे डोंबिवलीतील या मोठ्या पक्षत्यागामुळे मनसेची राजकीय घडी विस्कटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवकांसारख्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची साथ सुटणे हा मनसेसाठी निश्चितच मोठा धक्का मानला जात आहे. डोंबिवलीच्या आगामी निवडणुकीत या घडामोडींचा कसा परिणाम होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

विधानसभेला आतून पाठिंबा देण्यासाठी रामभाऊ 35 कोटी देतो म्हणाला, फडणवीसांकडे घेऊन गेला : जयसिंह मोहिते पाटील