Mumbai Mayor : मुंबईच्या महापौर पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र, भाजपचे 89 उमेदवार निवडून आलेत त्यामुळे मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, असा दावा केला जातोय. तर, माध्यमांमध्ये मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार अशा चर्चा सुरु आहेत. मात्र या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आलीय. ज्याचा जवळपास सगळयांनाच विसर पडलाय. ते म्हणजे मुंबईत या पूर्वीही भाजपचा महापौर होता. त्यामुळे आता भाजपचा महापौर झाला तर पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा मुंबईत भाजपचा महापौर असेल. साधारण 1982ची गोष्ट आहे जेव्हा डॉ. प्रभाकर संजीव पै हे मुंबईचे महापौर झाले होते. त्यामुळे डॉ. प्रभाकर संजीव पै नेमके कोण होते? त्यावेळेसची राजकीय स्थिती काय होती? समीकरणं काय होती? याबाबतची माहिती समजून घेऊयात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'जोवर मनसे आहे तोवर बिहार भवन होऊ देणार नाही', राज ठाकरेंचा 'शिलेदार' कडाडला
1977 च्या काळात जनसंघ+समाजवादी आणि लोकदल हे मिळून जनता पार्टी होती. मात्र 1979-80 पर्यंत जनता पार्टीत संघर्ष सुरु झाला. नेते आपल्या आपल्या वाटेने वेगळे झाले. आणि 1980 मध्ये जनता पार्टीतून विभक्त होवून भाजपची स्थापना झाली. 1980 च्या या काळात महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष प्रभावी होता. स्थानिक स्वराज्य संस्थांवरही कॉंग्रेसचंच वर्चस्व होतं.
तत्कालीन परिस्थितीत महापौर एकच वर्षांसाठी...
पुढे 1982 मध्ये 140 जागांसाठी महापालिका निवडणूक झाली होती. बहुमतासाठी 71 जागा आवश्यक होत्या. मात्र, काँग्रेस, शिवसेना, भाजप, डावे / समाजवादी किंवा काँग्रेसविरोधी अपक्ष यातल्या कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. नुकताच स्वतंत्र झालेला भाजप पक्ष तेव्हा लहान पक्ष होता. भाजपचे 19 नगरसेवक तेव्हा निवडून आले होते. मात्र, हा तो काळ होता जेव्हा महापौरपद व्यक्ति किंवा पक्षावर नाही तर आघाड्यांवर ठरायचं. आता महापौर पद 5 वर्षांसाठी असंत मात्र तेव्हा एकच वर्ष महापौर असायचा.
काँग्रेसच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच गंभीर आव्हान
घडलं असं की, बहुमत नसल्यामुळे काँग्रेसच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच गंभीर आव्हान मिळालं. शिवसेना + भाजप / जनसंघ विचारसरणीचे नगरसेवक + अपक्ष + आणि काही समाजवाद्यांनी मिळून काँग्रेसविरोधी आघाडी केली. बहुमताचा आकडा गाठला. नगरसेवकांमधून मतदान झालं. आणि डॉ. प्रभाकर डॉ. प्रभाकर पै यांची निवड झाली. डॉ. प्रभाकर पै काँग्रेसचे नव्हते आणि जनसंघ–जनता परंपरेशी त्यांची जवळीक होती या मेन मुद्द्यांवर मुंबईचे भाजपचे पहिले महापौर म्हणून डॉ. प्रभाकर पै यांची निवड झाली.
भाजपचा पहिला महापौर कोण?
बीएमसीच्या आतापर्यंच्या महापौरांच्या यादीतही डॉ. प्रभाकर पै यांचं नाव आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर झाला तर तो पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा असेन.
आता डॉ. प्रभाकर पै यांच्या विषयी थोडं सविस्तर जाणून घेऊयात. कर्नाटकातील एका छोट्या बरकुर नावाच्या गावात पै यांचा जन्म झाला. वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे होणाऱ्या दुःखद घटनांमुळे ते समाजसेवेकडे वळाले. 1958 पासून पूर्णवेळ समाजसेवेत वाहून गेलेले डॉ. पै मुंबईच्या बांद्रा-खार परिसरातील एक यशस्वी वैद्यकीय व्यवसायिकही होते. 1968 साली पै. पाली हिल - वांद्रे भागातून प्रचंड बहुमताने नगरसेवक म्हणून निवडून आले. याचदरम्यान म्हणजे 1968 ते 1984 मध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेत म्युनिसिपल काउन्सिलर म्हणून काम पाहिलं, पुढे 1982-83 मध्ये ते मुंबईचे महापौर राहिले. पुढे 1978- बेस्ट कमिटीचे अध्यक्ष, मेडिकल रिलीफ आणि पब्लिक हेल्थ कमिटीचे अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. रामकृष्ण मिशन खार (पूर्व) चे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केल्याचं म्हटंल जातं. त्यांनी बांद्रा परिसरातील पार्कांना महान व्यक्तींची नावे देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचही बोललं जातं.
हे ही वाचा : मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? शासनाकडून अधिकृत तारीख जाहीर
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांची सोशल मीडिया पोस्ट
डॉ. पै यांच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी देखील आपल्या सोशल मिडियावर पोस्ट केलीय. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "1982 मध्येच डॉ. प्रभाकर संजीवा पै हे मुंबईचे महापौर झाले होते आणि ते भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते होते याची आठवण तेव्हा त्या महापौर कार्यालयात कार्यरत असलेले ज्येष्ठ अधिकारी प्रकाश परांजपे शहापूरकर यांनी करून दिली." असं अकोलकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. तर पुढे ते म्हणालेत, "परांजपे यांनी आणखीही एक गोष्ट सांगितली. पै महापौर असतानाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक शिबीर झालं होतं त्या शिबिरास महापौर असलेले पै हे संघाचे अर्धी चड्डी घालून उपस्थित होते आणि त्यांच्या समवेत तिथे परांजपेही गेले होते." असंही ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
ADVERTISEMENT











