मुंबईच्या महापौरपदासाठी भाजप अन् ठाकरे गटात बोलणी सुरु असल्याची चर्चा, नेमकं काय घडतंय? सुषमा अंधारेंनी सांगितलं

Sushma Andhare on Mumbai Mahapalika Mayor : भाजप आणि ठाकरे गटामध्ये बोलणी सुरु आहे का? नेमकं काय घडतंय? याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सविस्तर भाष्य केलंय. सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या? सविस्तर जाणून घेऊयात... 

Sushama Andhare

Sushama Andhare

मुंबई तक

19 Jan 2026 (अपडेटेड: 19 Jan 2026, 11:14 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या महापौरपदासाठी भाजप अन् ठाकरे गटात बोलणी सुरु असल्याची चर्चा

point

नेमकं काय घडतंय? सुषमा अंधारेंनी सांगितलं

Sushma Andhare on Mumbai Mahapalika Mayor : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवलाय. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी शिंदेंच्या शिवसेनेने महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु केलीये. यासाठी शिंदे गटाने सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्याचीही माहिती समोर आली होती. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेने महापौरपदासाठी हॉटेल पॉलिटिक्स सुरु केल्यानंतर भाजप आणि ठाकरे गटात महापौरपदासाठी बोलणी सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. भाजप आणि ठाकरे गटामध्ये बोलणी सुरु आहे का? नेमकं काय घडतंय? याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सविस्तर भाष्य केलंय. सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या? सविस्तर जाणून घेऊयात... 

हे वाचलं का?

सुषमा अंधारे काय म्हणाल्या? 

सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे आणि फडणवीस या दोघांची महापौर पदावरून  चाललेली रस्सीखेच  माध्यमांमध्ये रंगत आहे. यात दोघांनीही ठाकरेंना मध्ये ओढण्याचे कारण नाही. शिंदे फडणवीस या दोघांनी एकमेकांशी काय  सौदेबाजी करायची ती खुशाल करावी. स्वतःचा मोलभाव वाढवण्यासाठी ठाकरेंना ऑफर किंवा ठाकरेंकडून प्रस्ताव अशा पद्धतीचे लुटूपुटुचे डाव खेळू नयेत. तुम्हाला टीका करायलाही ठाकरे आणि सत्तेत बसण्यासाठी एकमेकांवर दबाव तंत्र वापरण्यासाठीही ठाकरे कार्ड का वापरावे लागत आहे ? असा सवालही अंधारे यांनी केला. 

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ठाकरेंचे नगरसेवक कुठेही नॉटरीचेबल नाहीत. त्यांना कुठल्याही हॉटेलमध्ये डांबून ठेवलेलं नाही. ठेवायची गरज नाही. त्यामुळे टेबल न्यूज पेरण्याचा बालिश प्रयत्न कोणीही करू नये. लोकांनी ज्या विश्वासाने आम्हाला मते दिलेली आहेत तो विश्वास आमच्यासाठी सत्तेपेक्षा लाखमोलाचा आहे..! आम्ही लढतोय लढत राहू.. ! याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय..!!

हेही वाचा : डॉक्टर संग्राम पाटलांना लंडनला जाण्यापासून रोखलं, मुंबई विमानतळावर काय घडलं?

मुंबई महापालिका निवडणूक निकाल; कोणी किती जागा जिंकल्या? 

भारतीय जनता पार्टी – 89
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 65
शिवसेना (शिंदे गट) – 29
इंडियन नॅशनल काँग्रेस – 24
ऑल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन – 8
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 6
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – 3
समाजवादी पार्टी – 2
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) – 1

इतर महत्त्वाच्या बातम्या 

15 दिवसांपूर्वी पत्नीचं निधन, ठाकरेंचा शिलेदार खचला नाही, 30 वर्षांच्या संघर्षानंतर शिवसेनेने मुंबईतील 'हा' वार्ड जिंकला

    follow whatsapp