Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महानगरपालिकेत रविवारी मोठा बदल पाहायला मिळाला. वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यामुळे महापालिकेतील सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट झाले आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत 37 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात भाजप अपयशी ठरली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईच्या महापौरपदासाठी भाजप अन् ठाकरे गटात बोलणी सुरु असल्याची चर्चा, नेमकं काय घडतंय? सुषमा अंधारेंनी सांगितलं
'असे' आहे महापौरपदाचे समीकरण
उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेनेने 36 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर स्थानिक सहयोगी साई पक्षाचा एक नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळवत शिवसेनेची संख्या 38 वर पोहोचली होती. आता वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेने बहुमताचा आकडा सहज पार केला असून उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पाठिंबा
वंचितच्या नगरसेविका सुरेखा सोनावणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी मुंबईतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अधिकृत पाठिंबा पत्र सादर केला. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. तसेच यासाठी झालेल्या या बैठकीस आमदार डॉ. बाळाजी किणीकर आणि अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष सुनील चौधरी यांची उपस्थिती होती, ज्यामुळे या राजकीय घडामोडीचे महत्त्व अधिक ठळक झाले आहे.
हे ही वाचा : मुंबईच्या महापौर पदाबाबत एकनाथ शिंदे यांचं सुचक वक्तव्य म्हणाले, 'महापौर हा...'
का दिला पाठिंबा?
नगरसेवकांनी सांगितले की, आपल्या प्रभागांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. विशेषतः दलित वस्ती सुधार योजना तसेच अन्य स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यात आला आहे. नवीन राजकीय समीकरणांमुळे येत्या काही दिवसांत उल्हासनगर महानगरपालिकेत सत्तास्थापनेची प्रक्रिया वेग येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











