कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत महापौर पदासाठी यावेळी अनुसूचित जमाती ( ST)प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. महानगरपालिकेत अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर होताच शिवसेनेत महापौरपदासाठी अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. या आरक्षणामुळे शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल आणि किरण भांगले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शीतल मंढारी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना की मनसे.. कोणाचा होणार महापौर?
शिवसेना शिंदे गटाकडे अनुसूचित जमातीचे दोन नगरसेवक असल्याने पक्षात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भाजपकडे एकही अनुसूचित जमातीचा नगरसेवक नसल्यामुळे महापौर पदावरील भाजपचा दावा संपुष्टात आला आहे. तसेच मनसेने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे राजकीय समीकरणं आणखी स्पष्ट होताना दिसत आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे दोन तर दुसरीकडे मनसेचा एक असा पर्याय उपलब्ध असल्यामुळे केडीएमसीच्या महापौर पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा>> 'शिंदेंसोबत जायचं होतं तर आमच्यासोबत युती करायची नव्हती', KDMC वरून राऊत संतापले.. थेट सुनावलं!
◾शहरप्रमुख रवी पाटील समर्थित युवा दावेदार किरण भांगले आणि माजी नगरसेवकांच्या पाठिंब्याने हर्षाली चौधरी थविल यांच्यात थेट चुरस पाहायला मिळते आहे. भाजपने महापौर पदाचा दावा सोडत महायुतीचाच महापौर होणार असल्याचा स्पष्ट संकेत दिला आहे.
दरम्यान, दोन्ही दावेदारांना अज्ञात स्थळी हलवण्यात आलं असून अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. युवा महापौर की महिला महापौर, याकडे संपूर्ण कल्याण-डोंबिवलीचं लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा>> 'मनसे वारंवार भूमिका बदलतं..', पाहा निवडणुकीआधी 'या' प्रश्नावर काय म्हणालेले राज ठाकरे
◾यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका हर्षाली थविल म्हणाल्या की, महापौर पदाबाबतचा अंतिम निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो. जर आपल्याला महापौर पदाची संधी मिळाली तर शहरातील विकासकामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
◾दरम्यान, नवनिर्वाचित नगरसेवक किरण भांगले यांनीही आपली भूमिका मांडताना सांगितलं की, पक्षाने पहिल्यांदाच संधी दिली आणि निवडून येण्याचा मान मिळाला. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा प्रवास शक्य झाला असून, संधी मिळाल्यास शहराच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT











