'शिंदेंसोबत जायचं होतं तर आमच्यासोबत युती करायची नव्हती', KDMC वरून राऊत संतापले.. थेट सुनावलं!
Sanjay Raut on MNS KDMC: कल्याण-डोंबिवलमध्ये मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. या नव्या युतीमुळे मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाली आहे. याचविषयी बोलताना शिवसेना UBT चे नेते संजय राऊत यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
'स्वत: मनसेचे प्रमुख राज ठाकरेंना ती भूमिका मान्य नाही. ती पक्षाची भूमिका नाही.. हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावर आमच्या लक्षात आलंय. पण तुम्हाला स्थानिक लोकांना जर अशाप्रकारची युती करायची होती तर कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना UBT सोबत युती करायला नको होती. आमची भूमिका कठोर आणि कडवट आहे शिदेंच्या बाबतीत. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय.' असं म्हणत संजय राऊतांनी कल्याण-डोंबिवलीतील युतीबाबत तीव्र नाराजी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
संजय राऊतांचा संताप, पाहा मनसेबाबत काय म्हणाले...
शह-काटशहामध्ये नितीमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये हेच आमचं म्हणणं आहे. कल्याण-डोंबिवलीत जे घडलं ती मनसेची पक्षाची भूमिका नाही असं सांगण्यात आलेलं आहे. स्वत: मनसेचे प्रमुख राज ठाकरेंना ती भूमिका मान्य नाही. ती पक्षाची भूमिका नाही.. हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावर आमच्या लक्षात आलंय. पण तुम्हाला स्थानिक लोकांना जर अशाप्रकारची युती करायची होती तर कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना UBT सोबत युती करायला नको होती. आमची भूमिका कठोर आणि कडवट आहे शिदेंच्या बाबतीत. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय.
'खरं म्हणजे तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात. तिथे ते महायुती म्हणून लढले. त्यामुळे तिथे एकत्र येऊन ते सरकार बनवू शकतात. इतरांना त्यात घुसायचं कारण नव्हतं हे माझं मत आहे. अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलाय. कोणत्या पातळीवर घेतलाय ते त्यांनी सांगितलंय.. यावर आम्ही अंतर्गत चर्चा करू.'
हे ही वाचा>> 'मनसे वारंवार भूमिका बदलतं..', पाहा निवडणुकीआधी 'या' प्रश्नावर काय म्हणालेले राज ठाकरे
'जेव्हा त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात येतंय की, हा स्थानिक पातळीवर घेण्यात आलेला निर्णय आहे आणि या निर्णयाची आम्हाला कल्पना नाही.. हे जेव्हा आम्हाला कोणी सांगतं तेव्हा आम्ही त्यांच्याशी अंतर्गत चर्चा करू ना.'










