'...म्हणून भाजपबरोबरची युती तोडली', ठाकरेंनी बंद खोलीतील चर्चा उघड सांगितली

मुंबई तक

22 Feb 2024 (अपडेटेड: 22 Feb 2024, 08:18 PM)

भाजपने बंद खोलीत शिवसेनेला अडीच अडीच वर्षाचे वचन दिले होते. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी वचनभंग करून आम्हाला दगा दिला. त्यामुळेच युती तोडल्याचंही त्यांनी जाहीरपणे सांगितले.

political

mahavikas aghadi

follow google news

Uddhav Thackeray : ज्या गद्दार नेत्यांकडून फोन करून शेतकऱ्यांना फोन करून विचारले जाते, त्यामधील काही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांतील लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांना काय विचारताय की पंतप्रधान आवास योजनेचा लाभ तुम्हाल मिळाला आहे की नाही. त्यांच्या घरात जाऊन कधी तरी पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की, त्यांच्या घरावर साधा पत्राही नाही. त्याच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला की नाही माहिती नाही पण या गद्दारांना 50 खोक्यांचा हमीभाव मिळाला असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. 

हे वाचलं का?

दुष्काळाची परिस्थिती

उद्धव  ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर टीका करताना जोरदार प्रहार केला. बुलढाण्यात आता दुष्काळाची परिस्थिती आहे. मात्र याआधी झालेल्या नुकसानीचा तरी या सरकारकडून फायदा मिळाला आहे का असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला आहे. 

भाजपसोबत आपण का युती तोडली

उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका करताना गद्दारीवरूनही त्यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत आपण का युती तोडली त्याचीही त्यांनी आठवण सांगितली. 

 फॉर्म्युला ठरलेला 

भाजपने बंद खोलीत शिवसेनेला अडीच अडीच वर्षाचे वचन दिले होते. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी वचनभंग करून आम्हाला दगा दिला. बंद खोलीत अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला असतानाही त्यांनी शब्द फिरवला. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही केंद्रात मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांना राजीनामा देण्यास सांगितले.

केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला

त्यावेळी अरविंद सावंत यांनी राजीनामा दिलाही मात्र ज्यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबद्दल एक अवाक्षरही काढलं नाही. यासाठीच आम्ही भाजपसोबतच युती तोडल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

    follow whatsapp