Uddhav Thackeray on Ashish Shelar press conference , Mumbai : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील कथित गैरव्यवहार आणि मतचोरीच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मुद्द्यावर नुकताच मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. मोर्चादरम्यान राज ठाकरे यांनी मतदार याद्यांतील दुबार नावे हटवण्यासाठी थेट “खळखट्याक” करण्याचे आवाहन केले. दरम्यान, आता राज ठाकरे आणि महाविकास आघाडीला भाजप नेते आशिष शेलार ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान,आशिष शेलार यांनी दुबार मतदार दाखवल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
दुबार मतदारांचा मुद्दा मांडताना शेलार यांनी आकडेवारी सादर केली. त्यांनी सांगितले, “आम्ही 31 विधानसभा मतदारसंघांचे विश्लेषण केले असून त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायातील दुबार मतदारांची संख्या 2 लाख 25 हजार 791 इतकी आहे. संपूर्ण 288 मतदारसंघांचे विश्लेषण पूर्ण झाल्यावर ही संख्या 16 लाख 84 हजार 256 वर जाईल.” ही फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या असून, महाविकास आघाडीच्या समर्थकांची संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक असू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
आशिष शेलार यांच्याकडून दुबार मतदारांचा आरोप; कोणत्या मतदारसंघात किती?
कर्जत-जामखेड : रोहित पवार — 5532 दुबार मुस्लिम मते
साकोली : नाना पटोले — 477 दुबार मुस्लिम मते
वांद्रे पूर्व : वरुण सरदेसाई — 13,313 दुबार मुस्लिम आणि ख्रिश्चन मते
मुंब्रा : जितेंद्र आव्हाड — 30,601 दुबार मुस्लिम मते
लातूर शहर : अमित देशमुख — 20,613 दुबार मुस्लिम मते
“गळा मतचोरीचा... पण पुळका ‘व्होट जिहाद’चा, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट जिहाद’चा डाव रचला आहे.” तसेच राज ठाकरेदेखील ‘व्होट जिहाद’ करत असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला.
शेलार पुढे बोलताना म्हणाले, लोकसभा निवडणुकीत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आणि हा प्रकार महाविकास आघाडीचा सुनियोजित ‘व्होट जिहाद’ होता. हे देशाच्या लोकशाही, यंत्रणा आणि सुरक्षेशी खेळण्यासारखे आहे. आज आम्ही या सर्वांचा भंडाफोड करत आहोत. “महाविकास आघाडी आणि मनसे फक्त मराठी नावांचा उल्लेख का करतात? ही नावे का लपवतात?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. त्यांनी आरोप केला की, “एकाच फोटोखाली वेगवेगळी नावे दाखवून मतदार नोंदवले गेले आहेत. हा महाविकास आघाडीचा मोठा घोटाळा असून ‘बुरख्याआड राजकारण’ सुरू आहे.”
उद्धव ठाकरेंचं आशिष शेलारांना प्रत्युत्तर
दरम्यान, आशिष शेलार यांच्या आरोपांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे म्हणाले, मी आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं आहे. मतचोरीचा मुद्दा ते मानतच नव्हते. त्याच्यामुळे आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू बोलायचं धाडस दाखवलंय, हा त्यांच्यातील अंतर्गत वादाचा परिणाम असेल. आशिष शेलारांनी सिद्ध केलंय की, मतदार यादीत गोंधळ आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











