Uddhav Thackeray : नार्वेकरांच्या निवडीवर ठाकरे कडाडले, ‘लोकशाही संपवण्याच्या दिशेने…’

प्रशांत गोमाणे

• 01:51 PM • 29 Jan 2024

देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक , ही देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? असा खडा सवाल ठाकरेंनी विचारला आहे.

udhhav thackeray criticize rahul narwekar assembly speaker head of the commitee anti defection law maharashtra politics

udhhav thackeray criticize rahul narwekar assembly speaker head of the commitee anti defection law maharashtra politics

follow google news

Uddhav Thackeray Criticize Rahul Narwekar : देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणूकीनंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. आता याच नेमणूकीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक , ही देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? असा खडा सवाल ठाकरेंनी विचारला आहे. (udhhav thackeray criticize rahul narwekar assembly speaker head of the commitee anti defection law maharashtra politics)

हे वाचलं का?

ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचे वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच, परंतु त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना हि नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Ranjit Savarkar : ‘गांधीजींची हत्या नथुराम गोडसेच्या गोळीने झालेली नाही’, नव्या दाव्या खळबळ

तसेच आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा, यापुढे देशात असेल असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॅाक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल. अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल,असे देखील ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक, हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? असा सवाल देखील ठाकरेंनी विचारला आहे.

राज्य विधिमंडळात रविवारी 84 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व 60 व्या सचिव परिषेदचा समारोप झाला. यावेळी पक्षांतर बंदी कायद्यातच सुधारणा करण्याचा विचार पुढे आला असून यासाठी संशोधन समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली होती.

    follow whatsapp