मोठी बातमी : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा धमाका, किती जागा बिनविरोध? संपूर्ण यादी

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून जात असल्याचं चित्र आहे. दरम्यान, बिनविरोध जागांची यादी पाहूयात...

Vidhan Parishad Election 2026

Vidhan Parishad Election 2026

मुंबई तक

04 Jun 2026 (अपडेटेड: 04 Jun 2026, 04:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा धमाका

point

किती जागा बिनविरोध? संपूर्ण यादी

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा (दि.4) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक उमेदवारांनी शर्थीचे प्रयत्न केले. बंडखोरांनी आणि विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावेत, यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी मध्यस्थी केलेली पाहायला मिळाली. तरी देखील अनेक ठिकाणी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. किती जागा बिनविरोध झाल्या? किती ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडणार? हे जाणून घेऊयात...

हे वाचलं का?

हेही वाचा : खूपच चांगली बातमी! महाराष्ट्रात लवकरच कोसळणार धो-धो पाऊस.. अखेर मान्सून केरळात दाखल!

मतदान अन् मतमोजणी किती? 

दरम्यान, विधानपरिषदेच्या 17 रिक्त जागांसाठी 8 जून रोजी मतदान पार पडणार आहे, तर  22 जूनला या निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे. मात्र, 17 पैकी किती जागा बिनविरोध झाल्या आहेत? कोण-कोण थेट आमदार होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात.... 

बिनविरोध झालेल्या जागांची यादी 

1. कोकण विधान परिषद - सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे बिनविरोध - ठाकरेंच्या बाळ मानेंची माघार 

2. यवतमाळ विधान परिषद  - दुष्यंन्त चतुर्वेदी हे बिनविरोध  - भाजपचे बंडखोर  नितीन भुतडा यांची माघार

3.  चंद्रपूर वर्धा गडचिरोली विधानपरिषद - भाजपचे अरुण लाखानी बिनविरोध - काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांची माघार 

4. पुणे  विधानपरिषद - राष्ट्रवादीचे  विक्रम काकडे बिनविरोध - सुनील टिंगरे, श्रीकांत पाटील यांची माघार 

5. ठाणे विधानपरिषद - रवींद्र फाटक बिनविरोध - अभिजीत पवार यांची माघार 

6. आहिल्यानगर विधानपरिषद - प्राजक्त तनपुरे (होण्याची शक्यता, अपक्षाचा खोटी सही घेऊन अर्ज माघारी घेतल्याचा आरोप)

हेही वाचा : कोल्हापूर : प्रियकराने व्हिडीओ काढले, अन् लॉज, झाडी, कारमध्ये चौघांनी अब्रू लुटली

चंद्रपूरमध्ये काय घडलं?

चंद्रपूर वर्धा गडचिरोली स्थानिक मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येत अर्ज मागे घेतला. या निर्णयाची माहिती स्थानिक काँग्रेस नेत्यांना कार्यकर्त्यांना न देताच एकटे येऊन त्यांनी हा धक्कादायक निर्णय घेतला. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे. या माघारीमुळे महायुतीचे अरुण लाखानी हे बिनविरोध निवडून येणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. संख्याबळ पुरेसे नसल्याने आपण माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले असून, वरिष्ठांना तशी कल्पना दिल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, सुधीर कोठारी या अपक्ष उमेदवारानेही अर्ज मागे घेतला. 

पुण्यात काय घडलं?

पुण्यात विक्रम काकडे विरोधातील भाजपचे प्रदीप कंद राष्ट्रवादीतूनच फॉर्म भरलेले सुनील टिंगरे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचे श्रीकांत पाटील व कामटे या दोघांनी अर्ज मागे घेतले आहे. विक्रम काकडेंचा मार्ग मोकळा झालाय.

कोकणच्या जागेवर कोणत्या घडामोडी? 

कोकण विधान परिषद निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. उबाठा गटाचे उमेदवार सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत सुनिल तटकरे बिनविरोध निवडून येणार आहेत. दरम्यान, ठाकरे गटाने बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली.