'मी या पुढे कधीही एअर इंडियाच्या विमानात बसणार नाही', कोणता क्रिकेटरला भरलीय धडकी?

david warner : ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नरने एअर इंडियाच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली आहे. मी पुन्हा एअर इंडियाच्या विमानात कधीही बसणार नाही अशी भावना डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केली आहे. 

australian cricketer david warner Statement over ahemedabad air india accident

australian cricketer david warner Statement over ahemedabad air india accident

मुंबई तक

17 Jun 2025 (अपडेटेड: 17 Jun 2025, 12:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

खेळाडू डेव्हिड वॉर्नरने एअर इंडियाच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली

point

सोशल मीडिया पोस्टची एकच चर्चा

David warner : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचा मोठा विमान अपघात झाला. या विमान अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लंडन येथील गॅटविकला जाताना हा अपघात घडल्याने केवळ देशातच नाही,तर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नरने एअर इंडियाच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली आहे. मी पुन्हा एअर इंडियाच्या विमानात कधीही बसणार नाही अशी भावना डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : शुक्र आणि मंगळामुळे धनशक्ती राजयोग निर्माण होणार, 'या' तीन राशींच्या लोकांची तिजोरी नेहमी भरलेली राहणार

एअर इंडियाच्या क्रू मेंबरनं कंपनीच्या निष्काळजीपणाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्याच पोस्टवर डेव्हिड वॉर्नरने प्रतिक्रिया दिली होती. वॉर्नरने दिलेल्या प्रतिक्रियेचा स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे. 
 

नेमकी काय होती पोस्ट 

एका एअर इंडियाच्या माजी क्रू मेंबरनं पोस्टमध्ये लिहिलं की, नमस्कार! मी एअर इंडियात यापूर्वी क्रू मेंबर म्हणून काम केलं होतं. मला या विमानाचा चांगला अनुभव आहे. या एअर इंडियाच्या विमान कंपनीत वर्षानुवर्षे समस्या निर्माण होत आहेत. पण तरीही आम्ही अनेकदा या कंपनीत काम केलं, अशी पोस्ट संबंधित क्रू मेंबरनं केली होती. आता याच पोस्टवर डेव्हिड वॉर्नरने आपल्या मनातील खंत व्यक्त केली आणि म्हणाला की, मी कधीही या विमानात बसणार नाही. 

विमान अपघाताचा थोडक्यात घटनाक्रम

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाी पटेल विमानतळावरुन लंडन येथील गॅटविक विमानतळावर निघालेलं एअर इंडियाचं एआय 171 विमान होतं. एअर इंडियाचे बोईंग 787-8  ड्रीमलाइनवर उड्डानानंतर लँड झालं आणि कोसळलं. या अपघातात एकूण 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया विमानात बिघाड, डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर कोलकातामध्येच...

सुमारे 625 फूट उंचीवरुन विमान विमान बिथरलं आणि कोसळलं. ही घटना अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरातील बीडे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळलं आहे. 

    follow whatsapp