WTC Final : अजिंक्य रहाणेचं नशीब फळफळलं, थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येच संधी

Bcci announce team india squad for wtc 2023 :वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने श्रेयस अय्यरच्या जागी अजिंक्य राहणेचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या संघात समावेश केला आहे.

bcci announce team india squad for wtc 2023 ajinkya rahane

bcci announce team india squad for wtc 2023 ajinkya rahane

मुंबई तक

25 Apr 2023 (अपडेटेड: 25 Apr 2023, 07:47 AM)

follow google news

Bcci announce team india squad for wtc 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा झाली असतानाच आता बीसीसीआयने (bcci) टीम इंडियाची घोषणा केली आहे. या संघात सध्या चांगलाच फॉर्मात असलेल्या अजिंक्य राहणेला संधी मिळाली आहे. बीसीसीआयने श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) जागी अजिंक्य राहणेचा (Ajinkya rahane) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या संघात समावेश केला आहे. त्यामुळे या मोठ्या स्पर्धेत अजिंक्य रहाणे खेळताना दिसणार आहे. (bcci announce team india squad for wtc 2023 ajinkya rahane meake comeback)

हे वाचलं का?

श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) जागी टीम इंडियात तीन खेळाडूंच्या विचार केला जात होता. या तीन खेळाडूंमध्ये हनुमा विहारी, सुर्यकुमार यादव आणि अजिंक्य रहाणेचा विचार केला जात होता. सुर्यकुमार यादव मध्यंतरी आयपीएलपुर्वी ऑस्ट्रेलि्यासोबत खेळलेल्या गेलेल्या टेस्टमध्ये फ्लॉप ठरला होता. तसेच आयपीएलमध्ये देखील तो खास अशी कामगिरी करू शकला नाही आहे. त्यामुळे त्याचा पत्ता कट झाला होता. हनुमा विहारी देखील गेल्या काही सामन्यात आपल्या खेळीने बीसीसीआयला इम्प्रेस करू शकला नव्हता. त्यामुळे अखेर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya rahane)अनुभवाला आणि त्याचा फॉर्म पाहत त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येच त्याला संधी दिली आहे.

हे ही वाचा : ‘माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा’, धोनीने दिले निवृत्तीचे संकेत

कधी रंगणार WTC?

वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिपसाठी (wtc final 2023) निवडले गेलेले खेळाडू अॅशेसच्या पहिल्या दोन टेस्ट सामन्यातही दिसणार आहे.वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिप 7 ते 11 जून दरम्यान द ओवल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तर अॅशेसची सुरुवात 16 जूनपासून होणार आहे.यामध्ये पहिली टेस्ट 16 ते 20 जून दरम्यान एजबेस्टन क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. तर दुसरा टेस्ट सामना 28 जून ते 2 जूलै दरम्यान लॉर्डस मैदानात खेळवला जाणार आहे.

WTC साठी दोन्ही संघ

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिक्य रहाणे, के एल राहूल, के एस भरत (विकेट किपर), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,जयदेव उनाडकट

ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स कर्णधार, स्कॉट बोलेंड, एलेक्स केरी, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरीस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मारनस लाबूशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रॅनशो, स्टीव स्मिथ उप कर्णधार, मिचेल स्टार्क,डेविड वॉर्नर

    follow whatsapp