रणवीर सिंग – दिपीका पदुकोण IPL मध्ये नवीन संघ विकत घेण्याच्या शर्यतीत

मुंबई तक

• 04:31 AM • 22 Oct 2021

आयपीएलमध्ये नवीन संघ खरेदी करण्यासाठीची शर्यत आता अधिकच रंगतदार झाली आहे. आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन संघ समाविष्ट होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी रणवीर सिंग आणि दिपीका पदुकोण हे नवीन संघ घेण्याच्या शर्यतीत आहेत. याव्यतिरीक्त प्रसिद्ध इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडनेही नवीन संघ विकत घेण्यासाठी उत्सुक असल्याचं कळतंय. सुरुवातीला नवीन संघ खरेदी […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलमध्ये नवीन संघ खरेदी करण्यासाठीची शर्यत आता अधिकच रंगतदार झाली आहे. आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन संघ समाविष्ट होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी रणवीर सिंग आणि दिपीका पदुकोण हे नवीन संघ घेण्याच्या शर्यतीत आहेत. याव्यतिरीक्त प्रसिद्ध इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडनेही नवीन संघ विकत घेण्यासाठी उत्सुक असल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

सुरुवातीला नवीन संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत फक्त दोन कंपन्या होत्या, परंतू आता यासाठी आणखी अनेक कंपन्या शर्यतीत असल्याचं कळतंय. सुरुवातीला अदानी उद्योग समुह आणि RP-Sanjeev Goenka ग्रूप या दोन कंपन्या नवीन संघाच्या खरेदीसाठी शर्यतीत होत्या. परंतू यानंतर आणखी काही महत्वाच्या कंपन्यांनी संघ विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. आयपीएल आणि बॉलिवूडचं कनेक्शन हे जुनं आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघात शाहरुख खान आणि जुही चावला यांची भागीदारी आहे. तसेच अभिनेत्री प्रिती झिंटा ही पंजाब किंग्ज संघाची सह मालकीण आहे.

IPL सामन्यांच्या Broadcasting Rights मधून BCCI कमावणार एवढी रक्कम, आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसेल

दिपीका आणि रणवीर यांनी या नवीन संघखरेदीसाठी काय तयारी केली आहे याबद्दलची अधिक माहिती समजू शकलेली नाही. दिपीकाच्या घरात क्रीडा क्षेत्राची पार्श्वभूमी आहे. भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण हे दिपीकाचे वडील आहेत. याव्यतिरीक्त रणवीर सिंगही English Premier League शी संबंधित असून काही दिवसांपूर्वी तो NBA या बास्केटबॉल लिगचाही ब्रँड अँबेसिडर झाला आहे. बीसीसीआय नवीन संघाचे हक्क हे सध्याच्या घडीला बाहेरील कंपनीला देण्याच्या मनस्थितीत नाहीये. परंतू मालकीचं गणित हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलू शकतं अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

२४ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यानंतर २५ ऑक्टोबरला बीसीसीआय दोन नवीन संघांच्या मालकी हक्कांबद्दल घोषणा करणार आहे. याचदरम्यान बीसीसीआय २०२३ ते २०२७ पर्यंतच्या आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांचाही लिलाव करणार आहे. दोन नवीन संघाच्या विक्रीतून बीसीसीआयला साधारण ३ हजार ते साडेतीन हजार कोटींच्या फायद्याची अपेक्षा आहे. त्यामुळे २५ तारखेला नवीन संघांची मालकी कोणाकडे जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp