Ind Vs Aus: ‘भारतात कॅप्टन्सी करणं…’, स्टीव्ह स्मिथ मॅच जिंकल्यावर काय बोलला?

मुंबई तक

• 01:47 AM • 05 Mar 2023

Steve smith : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (Border Gavaskar Series ) बॉर्डर गावस्कर मालिका रंजक बनली आहे. तिसरी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने (Australia ) मालिकेत पुनरागमन केले आहे. पहिल्या दोन कसोटी गमावल्यानंतर हा विजय ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा ठरला. यासह कांगारूंनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. Australian captain Steve smith on captaincy […]

Mumbaitak
follow google news

Steve smith : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (Border Gavaskar Series ) बॉर्डर गावस्कर मालिका रंजक बनली आहे. तिसरी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने (Australia ) मालिकेत पुनरागमन केले आहे. पहिल्या दोन कसोटी गमावल्यानंतर हा विजय ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा ठरला. यासह कांगारूंनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. Australian captain Steve smith on captaincy

हे वाचलं का?

Virat Kohli : सचिनच्या 100 शतकांचा रेकॉर्ड विराट कोहली तोडू शकतो का?

स्मिथकडे संघाची जबाबदारी

मात्र, या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. संघातील अनेक खेळाडू आपल्या देशात परतले होते. या यादीत सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, फिरकी गोलंदाज अॅश्टन अगर आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांच्या नावांचा समावेश आहे. त्याचवेळी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सही कौटुंबिक कारणामुळे घरी गेला. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढत होत्या.

यानंतर संघाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली. आणि स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी 9 गडी राखून जिंकली. सोशल मीडियावर स्मिथच्या कर्णधारपदाची सतत चर्चा होत असते. ऑस्ट्रेलियाने कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा स्मिथकडे सोपवावी, असेही अनेक चाहते म्हणत आहेत. या प्रश्नाचे उत्तर खुद्द स्मिथनेच दिले आहे.

Ind vs Aus: तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका; कर्णधार कमिन्स घरी परतला

इंदूर कसोटी जिंकल्यानंतर स्टीव्ह स्मिथ म्हणाला, माझी वेळ निघून गेली. हा पॅटचा (कमिन्स) संघ आहे. मी कठीण परिस्थितीत संघाला नक्कीच हाताळले आहे, कारण पॅटला घरी जावे लागले. आमची सहानुभूती त्याच्यासोबत आहे. मला भारतात कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडायला आवडते. कदाचित मला सर्वात जास्त इथेच कॅप्टन्सी करायला आवडते. इथे प्रत्येक चेंडूवर काही ना काही घडते आणि त्याचा परिणाम सामन्यावर होतो. मला हे खूप आवडते. खेळाच्या पुढे असायला हवे. मला वाटते की मी या आठवड्यात चांगले कॅप्टन्सी केली आहे आणि मी त्याचा आनंद लुटला आहे, असं स्मिथ म्हणाला.

स्मिथने 2017 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले होते. त्या मालिकेत स्मिथच्या संघाने विराट कोहलीच्या भारतीय संघाला कडवी झुंज दिली. ऑस्ट्रेलियाने ती मालिका 2-1 ने गमावली, पण सिरीज अतितटीची राहिली. स्मिथने संघाचे आघाडीचे नेतृत्व केले आणि चार कसोटीत तीन शतकांसह 399 धावा केल्या.

चौथी कसोटी 9 मार्चपासून

चौथ्या कसोटीतही स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल, अशी अटकळ बांधली जात आहे. पॅट कमिन्सच्या पुनरागमनावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून सुरू होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

    follow whatsapp