गौतम गंभीर एबी डिव्हिलियर्सबद्दल असं काही बोलला की, होतोय ट्रोल

Gautam Gambhir on AB de Villiers: भारताचा माजी सलामीवीर (Gautam Gambhir) गौतम गंभीर सध्या चर्चेत आहे. इंडियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे आणि त्याआधी गौतम गंभीरने AB de Villiers एबी डिव्हिलियर्सबाबत वक्तव्य केले आहे. गौतम गंभीरने एका चर्चेदरम्यान सांगितले की, एबी डिव्हिलियर्सचे फक्त वैयक्तिक रेकॉर्ड (personal record ) आहेत, तो आयपीएलमध्ये इतका महान नाही. या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:14 PM • 05 Mar 2023

follow google news

Gautam Gambhir on AB de Villiers: भारताचा माजी सलामीवीर (Gautam Gambhir) गौतम गंभीर सध्या चर्चेत आहे. इंडियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे आणि त्याआधी गौतम गंभीरने AB de Villiers एबी डिव्हिलियर्सबाबत वक्तव्य केले आहे. गौतम गंभीरने एका चर्चेदरम्यान सांगितले की, एबी डिव्हिलियर्सचे फक्त वैयक्तिक रेकॉर्ड (personal record ) आहेत, तो आयपीएलमध्ये इतका महान नाही. या विधानावरुन गदारोळ झाला आहे. रविवारी (5 मार्च) गौतम गंभीर ट्विटरवर ट्रेंड झाला आणि चाहत्यांनी त्याच्या विधानावर टीका केली. गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केले होते.

हे वाचलं का?

“विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला पूजणं बंद करा”; गौतम गंभीर असं का म्हणाला?

गौतम गंभीर म्हणाला होता, ‘एबी डिव्हिलियर्स जर चिन्नास्वामीच्या मैदानावर 8-10 वर्षे खेळत असेल तर ते इतके छोटे मैदान आहे. तिथं कोणाला खेळायला दिलं तर त्याचा स्ट्राईक रेट आणि क्षमता सारखीच असेल. सुरेश रैनाच्या नावावर चार आयपीएल जेतेपदे आहेत, पण एबी डिव्हिलियर्सच्या नावावर फक्त वैयक्तिक रेकॉर्ड आहेत.

या विधानावर चाहत्यांनी गौतम गंभीरला ट्विटरवर खूप सुनावले. लोकांनी चिन्नास्वामी मैदानाची आकडेवारीही काढली, एका चाहत्याने लिहिले की, त्या मैदानात गौतम गंभीरचा रेकॉर्ड खराब आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो ज्या मैदानाला सोपं मैदान असल्याचं सांगत होता, पण तिथे स्वत: धावा काढू शकला नाही.

एका चाहत्याने लिहिले की, गौतम गंभीरची कोणत्याही मैदानावरील सर्वोच्च सरासरी केवळ 30 आहे, अशा स्थितीत त्याला आधी फलंदाजी येत नव्हती आणि आता त्याला कसे बोलावे हे कळत नाही. गौतम गंभीरला आयपीएलचा दिग्गज मानला जातो, त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने 2 विजेतेपद जिंकले आहेत.

T20 World Cup : भारताच्या कामगिरीसाठी IPL ला दोष देणं योग्य ठरणार नाही – गौतम गंभीर

एबी डिव्हिलियर्सचा रेकॉर्ड

दुसरीकडे, जर आपण एबी डिव्हिलियर्सबद्दल जाणून घेतलं तर तो आरसीबीसाठी एक दिग्गज खेळाडू आहे आणि भारतात त्याचे विशेष चाहते आहेत. एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 184 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 40 च्या सरासरीने 5162 धावा केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्सच्या नावावर 3 शतके, 40 अर्धशतके आहेत.

    follow whatsapp