…तर भारताला मिळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश

मुंबई तक

• 02:44 AM • 01 Mar 2023

India vs Australia 3rd Test: भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया (india vs Australia) यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून (1 मार्च) इंदूरमध्ये (Indore) खेळवला जात आहे. सकाळी 9.30 पासून सामना सुरू झाला आहे. (ICC World Test Championship) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना भारतीय संघासाठी खूप खास आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून 4 […]

Mumbaitak
follow google news

India vs Australia 3rd Test: भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया (india vs Australia) यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून (1 मार्च) इंदूरमध्ये (Indore) खेळवला जात आहे. सकाळी 9.30 पासून सामना सुरू झाला आहे. (ICC World Test Championship) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना भारतीय संघासाठी खूप खास आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. Indian team lead 2-0 against Australia

हे वाचलं का?

Ind Vs Aus : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ संकटात; 50 धावात निम्मा संघ तंबूत

आता जर भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करायचे असेल तर त्यांना मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकावा लागेल. म्हणजेच या इंदूर कसोटीत भारतीय संघाने विजयाची नोंद केली तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही प्रवेश करेल.

भारतीय संघाला एक सामना जिंकणे आवश्यक आहे

मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर आता भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत आतापर्यंत 16 पैकी 10 सामने जिंकले आहेत. संघाने 4 पराभव आणि 2 अनिर्णित सामने खेळले आहेत. तसेच, भारत 64.06 पॉइंट टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IND vs AUS Test Match: ‘अरे ही काय मस्करी चाललीय..’, इंदूरच्या पिचवरून लोकांचा संताप!

आता भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवायचे असेल, तर उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. दुसरीकडे, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत 17 पैकी 10 कसोटी जिंकल्या आहेत, 3 गमावल्या आहेत आणि 4 अनिर्णित खेळले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 66.67 गुणांच्या टक्केवारीसह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

7 जूनपासून लंडनमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल

आता जर भारतीय संघानेही शेवटच्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला तर त्याची पुन्हा विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाशी मुकाबला होईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे.

या वेळी म्हणजेच 2021-2023 हंगामात, ICC ने पॉइंट सिस्टममध्ये थोडा बदल केला आहे. यावेळी सामना जिंकण्यासाठी 12 गुण दिले जात आहेत. बरोबरीसाठी 6 गुण, ड्रॉसाठी 4 गुण आणि पराभवासाठी कोणतेही गुण नाहीत. दुसरीकडे, गुणांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, जिंकल्यावर 100, टाय झाल्यास 50, ड्रॉवर 33.33 आणि हरल्यावर कोणतेही गुण दिले जाणार नाहीत. गुणांच्या टक्केवारीच्या आधारे संघ ठरवले जातील.

भारताचे प्लेइंग-11: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, एस. भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग-11: ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टी. मर्फी, नॅथन लियॉन, एम. कुनहानेमन

    follow whatsapp