मोठी बातमी : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडलं, इन्स्टाग्राम स्टोरीतून सगळं सांगितलं

Smriti Mandhana confirms Wedding has been called off : तिने पुढे दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन करत, परिस्थितीतून सावरायला वेळ द्यावा, अशी विनंती केली.

Mumbai Tak

मुंबई तक

07 Dec 2025 (अपडेटेड: 07 Dec 2025, 02:07 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडलं

point

इन्स्टाग्राम स्टोरीतून सगळं सांगितलं

Smriti Mandhana confirms Wedding has been called off :  भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधनाने अखेर आपल्या लग्नाविषयी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबद्दल अनेक प्रकारच्या अफवा समोर येत होत्या. 23 नोव्हेंबर रोजी होणारे त्यांचे लग्न अचानक पुढे ढकलल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर मानधनाने रविवारी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अधिकृत निवेदन जारी करत लग्न रद्द झाल्याची घोषणा केली.

हे वाचलं का?

मानधनाने आपल्या निवेदनात लिहिले, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मी माझं आयुष्य खासगीपणे जगण्याची इच्छा बाळगणारी व्यक्ती आहे. पण आता स्पष्ट बोलणे आवश्यक झाले आहे. पलाशसोबतचे लग्न रद्द करण्यात आले आहे. हा विषय इथून पुढे वाढवू नये, अशी विनंती मी करते.” तिने पुढे दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन करत, परिस्थितीतून सावरायला वेळ द्यावा, अशी विनंती केली.

“देशासाठी सर्वोत्तम कामगिरी हेच माझे ध्येय”

लग्न रद्द झाल्यानंतरही माझा आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलणार नसल्याचे मानधनाने स्पष्ट केले. तिने लिहिले, “प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठा उद्देश असतो. माझ्यासाठी तो उद्देश म्हणजे भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि देशासाठी सर्वोत्तम खेळणे. मी शक्य तितक्या कालावधीपर्यंत भारतासाठी क्रिकेट खेळत राहण्याची इच्छा बाळगते. ट्रॉफी जिंकणे आणि संघाला विजय मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे.” तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानत पुढे सकारात्मक पद्धतीने जाण्याची वेळ आली असल्याचे म्हटले.

लग्न अचानक रद्द का झाले?

23 नोव्हेंबरच्या सकाळी मानधनाच्या कुटुंबावर मोठे संकट आले. लग्नाच्या तयारीदरम्यान तिचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले. या कारणाने लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती तिच्या मॅनेजरकडून देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पलाश मुछालदेखील आजारी पडल्याची माहिती समोर आली. यानंतर दोघांच्या नात्याविषयी विविध चर्चा रंगू लागल्या. शेवटी, सुरू असलेल्या सर्व तर्कांना पूर्णविराम देत स्मृतीने अधिकृतपणे जाहीर केले की तिचे आणि पलाशचे लग्न पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. सध्या मानधना आगामी मालिकांवर लक्ष केंद्रित करत असून, भारतीय महिला क्रिकेट संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचे तिने सांगितले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

चंद्रपूर: सुखी संसार सुरू असताना परपुरुषाशी तार जुळले, प्रेमासाठी आणाभाका अन् दोघांनी मिळून नवऱ्याला संपवलं

    follow whatsapp