IND vs SA : टीम इंडियाला मोठा झटका, आफ्रिकेविरूद्ध ‘हे’ खेळाडू संघातून आऊट

प्रशांत गोमाणे

• 04:16 PM • 16 Dec 2023

टी20 मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला वनडे 17 डिसेंबरला खेळवला जाणार आहे. यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

ind vs sa ist one day match deepak chahar mohmmad shami out of series india vs south africa odi test series

ind vs sa ist one day match deepak chahar mohmmad shami out of series india vs south africa odi test series

follow google news

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला उद्या रविवार 17 डिसेंबरपासून सूरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचे दोन खेळाडू मालिकेतून बाहेर झाले आहेत. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे, तर मोहम्मद शमी हा टेस्ट मालिकेतून बाहेर झाला आहे. हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (ind vs sa ist one day match deepak chahar mohammed shami out of series india vs south africa odi test series)

हे वाचलं का?

टी20 मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला वनडे 17 डिसेंबरला खेळवला जाणार आहे. यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहर वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. कौटुंबिक कारणांमुळे त्याने टीम इंडियातून माघार घेतली.चहरच्या कुटुंबावर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे. यामुळे तो टी-20 मालिकाही खेळू शकला नाही. एकदिवसीय मालिकेत त्याच्या जागी बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीपची निवड करण्यात आली. हा वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो.

हे ही वाचा : Uddhav : ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार हल्ला, ‘तुम्ही अदानीचं बूट चाटताय’

दीपक चहर व्यतिरीक्त आणखीण एक खेळाडू मालिकेतून बाहेर झाला आहे. मोहम्मद शमीला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. टाचेच्या दुखापतीमुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही. त्यांच्या बदलीची घोषणा अद्याप करण्यात आली आहे. पण भारताकडे शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा या पाच वेगवान गोलंदाज आहेत. गरज भासल्यास यापैकी काहीही घेतले जाऊ शकते.

दरम्यान श्रेयस अय्यर एकदिवसीय मालिकेदरम्यान फक्त पहिलाच सामना खेळणार आहे. यानंतर तो कसोटी संघात सामील होईल आणि शेवटचे दोन वनडे खेळणार नाही.

हे ही वाचा : ‘चहा प्यायला रूपया नाही’, संसदेतील हल्ल्यानंतर अमोल शिंदेच्या कुटुंबियांची कशी आहे अवस्था?

भारताची वनडे टीम :

केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, अविनाश कुमार, अर्शदीप सिंग, आकाश दीप.

भारताची टेस्ट टीम :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत, बी. , प्रसिद्ध कृष्ण.

    follow whatsapp