Ind vs SL : Rahul Dravid चे ‘ते’ शब्द आणि दीपक चहरने सामन्याचं चित्रच बदललं

मुंबई तक

• 02:31 AM • 21 Jul 2021

कोलंबोच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३ विकेट राखून मात करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. श्रीलंकेने दिलेल्या २७६ रन्सचा पाठलाग करताना भारतीय संघ दोनवेळा अडचणीत सापडला होता. एका क्षणाला मैदानात अशी परिस्थिती निर्माण झाली की दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार ही बॅटींगचा कमी अनुभव असलेली जोडी मैदानात होती. अशावेळी टीम इंडियाचा […]

Mumbaitak
follow google news

कोलंबोच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३ विकेट राखून मात करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. श्रीलंकेने दिलेल्या २७६ रन्सचा पाठलाग करताना भारतीय संघ दोनवेळा अडचणीत सापडला होता. एका क्षणाला मैदानात अशी परिस्थिती निर्माण झाली की दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार ही बॅटींगचा कमी अनुभव असलेली जोडी मैदानात होती. अशावेळी टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड हा ड्रेसिंग रुममधून डगआऊटमध्ये आला आणि त्याने राहुल चहरच्या कानात दीपक चहरसाठी एक खास संदेश सांगितला.

हे वाचलं का?

मधल्या ब्रेकमध्ये राहुल द्रविडचा हा संदेश दीपक चहरपर्यंत पोहचवण्यात आला आणि यानंतर दीपक चहरने अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. यादरम्यान दीपकने वन-डे क्रिकेटमधली आपली पहिली हाफ सेंच्युरीही झळकावली. सामना संपल्यानंतर राहुल द्रविडने आपल्यासाठी काय संदेश पाठवला होता याबद्दल दीपकने खुलासा केला. “टीम इंडियाला मॅच जिंकवून देण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. राहुल द्रविड सरांनी मला जास्तीत जास्त बॉल खेळायला सांगितलं. मी भारत अ कडूनही काही महत्वाच्या इनिंग खेळल्या आहेत. राहुल सरांना माझ्यावर विश्वास आहे. त्यांच्या मते मी सातव्या क्रमांकाचा चांगला फलंदाज बनू शकतो.”

दीपक चहरने ८२ बॉलमध्ये ७ फोर आणि १ सिक्स लगावत नाबाद ६९ रन्स केल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे सात विकेट गेल्यानंतर दीपक चहरने भुवनेश्वर कुमारसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. विजयासाठी ५० रन्स हव्या असताना सामना जिंकू असा आत्मविश्वास दीपक चहरला आला. पण आगामी सामन्यांमध्ये मला बॅटींग करायची वेळ येऊ नये अशीही आशा दीपकने यावेळी बोलून दाखवली.

Ind vs SL : Team India च्या यंग ब्रिगेडकडून लंकादहन, मालिकेत भारताला विजयी आघाडी

    follow whatsapp