Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान भिडणार, ‘हे’ 3 मोठे विक्रम मोडणार!

भागवत हिरेकर

31 Aug 2023 (अपडेटेड: 31 Aug 2023, 12:27 PM)

Asia cup 2023 news : match between India and Pakistan will be played on September 2 in Kandy city of Sri Lanka. Three such big records can be made in this match, on which the fans will also keep an eye on.

india vs pakistan asia cup 2023 : A total of 132 ODI matches have been played between India and Pakistan so far, out of which the Indian team has won 55 and lost 73.

india vs pakistan asia cup 2023 : A total of 132 ODI matches have been played between India and Pakistan so far, out of which the Indian team has won 55 and lost 73.

follow google news

India pakistan match 2023 : आशिया कप 2023 चा रणसंग्राम सुरू झाला आहे. पहिला सामना मुलतान येथे खेळला गेला, यात यजमान पाकिस्तानने नवखा संघ नेपाळचा 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. मायदेशात एकदिवसीय फॉर्मेटमध्ये पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय आहे. आता पाकिस्तानचा दुसरा सामना टीम इंडियासोबत आहे. ( These 3 big records will be broken in the India-Pakistan match)

हे वाचलं का?

हा सामना पाकिस्तानसाठी सोपा नसेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी शहरात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ विजयासाठी भिडणार असले, तरी या सामन्यात असे तीन मोठे विक्रम होऊ शकतात, ज्यावर क्रिकेटप्रेमींची नजर असणार आहे.

शतकांचा धोनीचा विक्रम मोडणार…

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 132 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी भारतीय संघाने 55 जिंकले आहेत आणि 73 गमावले आहेत. 4 सामने अनिर्णित राहिले. या सर्व सामन्यातील दोन्ही संघांचे रेकॉर्ड बघितले तर, भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा सलमान बट यांनी प्रत्येकी सर्वाधिक 5 शतके झळकावली आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 3 खेळाडूंनी 4-4 शतके झळकावली.

वाचा >> Asia Cup 2023: BCCI ची केएल राहुलवर मेहरबानी का..? ‘या’ खेळाडूंवर अन्याय…

तर 4 खेळाडूंनी 3-3 शतके झळकावली आहेत. पण या सगळ्यात पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त एकाही भारतीयाला पाकिस्तानविरुद्ध 2 पेक्षा जास्त शतके झळकावता आलेली नाहीत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही प्रत्येकी 2 शतके झळकावली आहेत. यापैकी कोणीही पुढच्या सामन्यात शतक झळकावल्यास, एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 2 पेक्षा जास्त शतके ठोकणारा सचिननंतरचा तो दुसरा भारतीय ठरेल.

महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन आणि नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी 2 शतके झळकावली आहेत. या सगळ्यांना मागे टाकण्याची सुवर्णसंधी कोहली आणि रोहित शर्माकडे आहे.

बुमराह कुंबळेचा विक्रम मोडेल का?

दुखापतीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही मोठा विक्रम करण्याची संधी आहे. खरं तर एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगा अव्वल आहे. त्याने 4 सामन्यांत 15 बळी घेतले आहेत. तर दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानेही 4 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत.

वाचा >> शरद पवारांनी टाकला भलताच डाव, PM मोदींना चॅलेंज अन् अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम?

पण एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये कुंबळे अव्वल आहे. सक्रिय खेळाडूंपैकी बुमराहने सध्या 2 सामन्यात केवळ 4 विकेट घेतल्या आहेत. बुमराहने पुढील सामन्यात आणखी 4 विकेट घेतल्यास तो कुंबळेचा विक्रम मोडेल आणि पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकात सर्वाधिक एकदिवसीय विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनेल.

रोहितला गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी

भारतीय कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यात शतक ठोकल्यास तो आणखी एक विक्रम आपल्या नावावर करेल. खरं तर, एकदिवसीय आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू अर्जुन रणतुंगाच्या नावावर आहे. रणतुंगाने 13 सामन्यात 594 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि तिसऱ्या क्रमांकावर माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली आहे.

धोनीने 14 सामन्यात 579 धावा केल्या होत्या. तर गांगुलीने 9 सामन्यात 400 धावा केल्या होत्या. या यादीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 5 सामन्यात 317 धावा केल्या आहेत. रोहितने 83 धावा केल्या, तर तो गांगुलीला मागे सोडेल. अशाप्रकारे, तो आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय आणि जागतिक पातळीवर तिसरा खेळाडू ठरेल.

    follow whatsapp