IND vs SL 2nd ODI : श्रीलंकेचा 4 विकेट्सनी पराभव; भारताने मालिका घातली खिशात

कोलकाता : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा ४ विकेट्सनी पराभव केला. यासोबत ३ सामन्यांची मालिका २-० अशी आघाडी घेत खिशातही टाकली. भारताने श्रीलंकेचे २१६ धावांचे आव्हान ६ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. केएल राहुलने मोक्याच्या क्षणी अर्धशतक करुन भारताला विजय मिळवून दिला. ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानेही ३६ धावांची खेळी करत राहुलला चांगली साथ दिली. तत्पुर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:13 PM • 12 Jan 2023

follow google news

कोलकाता : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा ४ विकेट्सनी पराभव केला. यासोबत ३ सामन्यांची मालिका २-० अशी आघाडी घेत खिशातही टाकली. भारताने श्रीलंकेचे २१६ धावांचे आव्हान ६ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. केएल राहुलने मोक्याच्या क्षणी अर्धशतक करुन भारताला विजय मिळवून दिला. ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानेही ३६ धावांची खेळी करत राहुलला चांगली साथ दिली.

हे वाचलं का?

तत्पुर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंजाजांनी टिच्चून मारा करत श्रीलंकेच्या दोन्ही सलामीविरांना मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही. सहाव्या षटकात मोहम्मद सिराजने अविष्का फर्नांडोचा त्रिफळा उडवत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर कुसल मेंडीस आणि नुवानिदू फर्नांडोने श्रीलंकेचा हालता ठेवला. मात्र फिरकीपटू कुलदीप यादवने मेंडीसला बाद करत ही जोडी फोडून काढली.

त्यानंतर ठरविक अंतरात श्रीलंकेच्या विकेट्स पडत गेल्या. अखेरीस अवघ्या २१५ धावांवर श्रीलंकेची टीम ऑल आऊट झाली. भारताकडून मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर उमरान मलिकने २ आणि अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.

प्रत्युत्तर दाखल मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचीही सुरुवात खराब झाली. भारताने दोन्ही सलामीवीर अवघ्या ४१ धावांत गमावले. रोहित शर्मा १७ आणि शुभमन गिल २१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यापाठोपाठ मागच्या सामन्यातील शतकवीर कोहलीही अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण श्रेयसही स्वस्तात बाद झाला.

टॉप ऑर्डर ढेपाळल्यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी सावध फलंदाजी करत नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे भारताला विजयाच्या जवळ पोहचवता आलं. केएल राहुलने १०३ चेंडूत नाबाद ६४ धावांची अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने ४४ व्या षटकात श्रीलंकेचे २१६ धावांचे आव्हान ६ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.

    follow whatsapp