Avneet Kour: क्रिकेट विश्वातील किंग म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. तो त्याच्या शौलीसाठी, त्याच्या कौटुंबिक जीवनासाठी आणि खेळाबाबत नेहमी चर्चेत असतो. मात्र, आता त्याच्यामुळे एक अभिनेत्री चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर अभिनेत्रीच्या एका फॅन पेजला विराट कोहलीने लाईक केले. या किरकोळ कृतीवरून सोशल मीडियावर मोठा गाजावाजा झाला आहे. आता हे फॅन पेज इतर कोणाचे नसून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौरचं होतं. यावरून चक्क विराट कोहलीला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
ADVERTISEMENT
विराट कोहलीने सोशल मिडिया हँडलवर संबंधित प्रकरणावर स्पष्टोक्ती दिली आहे. त्याने लिहिले की, मी सांगू इच्छितो की, "माझे फिड क्लिअर करताना हा प्रकार घडला. त्यावेळी अल्गोरिदममुळे इंटरअॅक्शन रजिस्टर्ड झालं असावं. काहीही हेतूपूर्वक नव्हतं. त्यामुळे विनाकारण कोणतेही तर्क-वितर्क लावू नका. आपण समजून घ्याल, धन्यवाद!", अशी स्टोरी शेअर करत विराटने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
हे ही वाचा>> IPL 2025: 35 चेंडूत 100 धावा करणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मराठी आहे?
दरम्यान, या प्रकरणावरून सोशल मीडियावर निरर्थक चर्चा सुरू झाली होती. काही चाहत्यांनी विराट कोहलीने अभिनेत्रीच्या पेजला लाईक केलेले स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले. हा प्रकार विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्काच्या वाढदिवशी 1 मे 2025 रोजी घडला.
कोण आहे अभिनेत्री अवनीत कौर?
13 ऑक्टोबर 2001 रोजी पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेल्या अवनीत कौर वयाच्या 8व्या वर्षापासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. तिने 2010 मध्ये 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स' मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि 'डान्स के सुपरस्टार्स' मध्येही भाग घेतलेला. तिचा टीव्हीवरील अभिनय प्रवास 2012 मध्ये 'मेरी माँ' या मालिकेने सुरू झाला. यानंतर ती 'झलक दिखला जा', 'सावित्री एक प्रेम कहानी' आणि 'एक मुठ्ठी आसमान' सारख्या शोमध्ये दिसली.
हे ही वाचा>> Anaya Bangar: 'क्रिकेटर्संनी न्यूड फोटो पाठवले अन्', लिंग बदल झालेल्या अनाया बांगरने सांगितलं हादरवून टाकणारं सत्य
2014 मध्ये तिने यशराज फिल्म्सच्या 'मर्दानी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले. त्याच वर्षी तिने 'हमारी सिस्टर दीदी' मध्ये काम केले. 2017 मध्ये, तिने स्टार प्लसवरील चंद्र नंदिनी या मालिकेत राजकुमारी चारुमतीची भूमिका साकारली होती. पण तिला खरी ओळख 2018 मध्ये मिळाली, जेव्हा तिने सब टीव्हीवरील 'अलाद्दीन - नाम तो सुना होगा' या शोमध्ये सुलताना यास्मिनची भूमिका साकारलेली.
ओटीटी आणि चित्रपटांचा प्रवास
अवनीत अलीकडेच अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती, ज्याची निर्मिती कंगना राणौतने केली होती. डिसेंबर 2024 मध्ये, ती एमएक्स प्लेअरच्या मर्डर मिस्ट्री 'पार्टी टिल आय डाय' मध्ये दिसली होती. याशिवाय तिचा 'लव्ह इन व्हिएतनाम' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे, ज्याची घोषणा 2024 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आली होती.
शुभमन गिलसोबतच्या लिंकअपची चर्चा
या वर्षी, अवनीतने दुबईमध्ये झालेल्या भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांचे फोटो शेअर केले होते, त्यानंतर शुभमन गिलसोबतच्या तिच्या नात्याबद्दलची चर्चा सुरू झाली होती. एका फोटोमध्ये तिने शुभमनला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.
सोशल मीडिया सेन्सेशन
अवनीत कौरचे इंस्टाग्रामवर 32 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 'केसरीयो रंग', 'पगला', 'किन्ने सालां बाद', 'एक्स कॉलिंग' आणि 'तेनू नी पता' यांसारख्या अनेक हिट म्युझिक व्हिडिओंमध्येही ती दिसली आहे.
ADVERTISEMENT
