IPL 2021 : 10 हजार रन्स, 300 विकेट, पोलार्डचा टी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम

IPL च्या चौदाव्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा कायरन पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. पंजाबचा कॅप्टन लोकेश राहुलची विकेट घेत पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार रन्स आणि ३०० विकेट असा दुहेरी पल्ला गाठला आहे. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पोलार्ड पहिला खेळाडू ठरला आहे. Kieron Pollard now becomes the only player […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:22 PM • 28 Sep 2021

follow google news

IPL च्या चौदाव्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा कायरन पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. पंजाबचा कॅप्टन लोकेश राहुलची विकेट घेत पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार रन्स आणि ३०० विकेट असा दुहेरी पल्ला गाठला आहे.

हे वाचलं का?

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पोलार्ड पहिला खेळाडू ठरला आहे.

त्याआधी पोलार्डने पंजाबच्या ख्रिस गेलला आपल्या जाळ्यात अडकवून २९९ वी विकेट घेतली. यानंतर त्याने राहुललाही आपल्या जाळ्यात अडकवलं. सलग तीन सामन्यांत पराभव स्विकारावा लागल्यानंतर रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला.

मुंबईच्या बॉलर्सनी पंजाबच्या बॅटींग लाईनअपला पहिल्यापासून अंकुश लावत त्यांना मोठी धावसंख्या करु देणार नाही याची काळजी घेतली. पंजाबकडून मार्क्रम आणि दीपक हुडा यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे संघाने १३५ धावांचा टप्पा गाठला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह-कायरन पोलार्डने प्रत्येकी २-२ तर कृणाल पांड्या आणि राहुल चहर यांनी १-१ विकेट घेतली.

    follow whatsapp